सुचणाऱ्या संकल्पना लगेच अमलात आणा, जास्त विचार करत बसू नका…


लेखन : श्रीकांत आव्हाड
======================

देशात सव्वाशे कोटी लोक आहेत.
यापैकी ७०-८० कोटी तरुण आणि थोडे मध्यमवयस्क आहेत.
प्रत्येकाच्या डोक्यात दिवसाला सरासरी ६०,००० विचार येतात.
मग यातल्या काही लाख जणांच्या डोक्यात एकसारखे विचार येत असतीलच.
यातले कित्येक विचार व्यवसायाविषयी असतील.
कित्येक नवीन संकल्पना या एकाच वेळी काही हजार किंवा लाख जणांना सुचल्या असतील.
अगदी ती संकल्पना स्थानिक पातळीवरची असेल.
पण स्थानिक पातळीवर सुद्धा ती काही शे लोकांना सुचलेली असेलच कि.
पण या काही लाखपैकी एखादाच ती संकल्पना सुरु करताना दिसतो.


बहुतेकांना सुचलेली संकल्पना यशस्वी होईल कि नाही याची भीती असते.
म्हणून ते दुसऱ्या कुणीतरी ती सुरु करण्याची वाट पाहतात.
आणि दुसरा कुणी त्यात यशस्वी झाला कि मग ती संकल्पना सुरु करण्याचा विचार करतात.
पण आता ती संकल्पना दुसऱ्याने अमलात आणली आहे या विचाराने बऱ्याचदा तो प्लॅनच रहित करतात
किंवा प्लॅन अमलात आणला तरी जेवढ्या ऊर्जेने प्लॅन तयार केला, संकल्पनेवर काम केलं तेवढ्या ऊर्जेने पुढे काम केलं जात नाही.
कारण इतर कुणीतरी ते काम आपल्या आधीच केलं आहे याची खंत मनाला सतावत असते.
सर्वात आधी सुरुवात करणारा हा रस्ता तयार करत असतो.
तो मार्केटचा राजा असतो.
ओबडधोबड का असेना पण तो रास्ता तयार करतो.
त्यावर अडखळत का असेना पण चालण्याचा प्रयत्न करतो.
त्यातून आपली ओळख निर्माण करतो.
त्यानंतर येणारे त्या रस्त्यावर फक्त जास्त हुशारीने चालण्याचा प्रयत्न करतात.
पण कायमस्वरूपी तोच लक्षात राहतो ज्याने सुरुवात केलेली असते.


माझ्या बाबतीत काही वेळा असं झालेलं आहे. आपल्यापैकी कित्येकांसोबत असं झालं असेलच. संकल्पना सुचली आहे, पण अमलात आणायला उशीर झाला आणि इतर कुणीतरी ती अमलात आणली, आणि आपण मागे पडलो.
सुरवात करा. थोडक्यात करा, आवाक्यात करा… लहानशी का असेना पण सुरुवात करा…


व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!