व्यावसायिकांसाठी कर्मचारी हाताळणीसंबंधी काही उपयुक्त टिप्स


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसाय करत असताना कर्मचारी हाताळणी हे एक मोठे आणि जिकरीचे काम असते. चांगले कर्मचारी व्यवसायाला मोठं करण्यासाठी महत्वाचे असतात. यासाठी हे कर्मचारी चांगले सांभाळावे लागतात.

कर्मचारी हाताळणीसंबंधी काही उपयुक्त टिप्स पाहुयात

१. कर्मचारी निवड विचारपूर्वक करा. प्रत्येकवेळी आपल्याकडे चांगलेच कर्मचारी येतील असे नव्हे, रोटेशन महत्वाचे आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करा.

२. कर्मचाऱ्यांकडून आपल्या कौशल्याप्रमाणे कामाची अपेक्षा करू नका. त्यांची विचार करण्याची एक मर्यादा असते, व्यवसायिकासारखी कर्मचाऱ्याची मानसिकता असती तर त्याने स्वतःचा व्यवसाय केला असता.

३. प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्किल सारखे असू शकत नाही. प्रत्येकाची कार्यक्षमता सारखी असू शकत नाही. प्रत्येकाला एकाच मापात तोलू नका. प्रत्येकाची कार्यक्षमता ओळखून त्यानुसार त्यांना विकसित करा.

४. प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेळोवेळी मूल्यमापन करून त्यांच्यात सुधारणेसाठी नेहमी प्रयत्नशील रहा. वेळोवेळी कौशल्य, व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम घ्या.

५. चांगल्या कामासाठी कर्मचाऱ्याचे जाहिर कौतुक करण्यात काहीही कसर ठेऊ नका. यशाचे क्रेडिट देण्यात कमी पडू नका.

६. कर्मचाऱ्यांना लोकांसमोर अपमानित करू नका. कौतुक सर्वांसमोर आणि रागाचे बोल खाजगीमधेच… सर्वांसमोर दुखावलेला व्यक्ती प्रामाणिक राहण्याची शक्यता नसते. पण खाजगीमधे ऐकलेले शब्द जास्त मनावर घेतले जात नाहीत.

७. कर्मचाऱ्यांना अडीअडचणींमधे नेहमी सहकार्य करा, सुखदुःखात सहभागी व्हा. कर्मचारी आपल्या व्यवसायाचा महत्वाचा हिस्सा असतात. आपली कंपनी एखाद्या कुटुंबापेक्षा वेगळी नसते.

८. कर्मचाऱ्यांचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य असते याचे भान ठेऊनच कामाचे शेड्युल असावे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबाशी संबंधात तुटले तर त्यांचे कामातही मन लागत नाही. त्यांना कुटुंबाला वेळ देण्यासाठी प्रवृत्त करा.

९. कर्मचाऱ्यांच्या मानसिक शांतीसाठी नेहमी वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत. कर्मचारी रोबोट नसतात. त्यांच्या भावनांचाही नेहमी विचार करा. कर्मचारी मानसिकन्दतुष्टया सुदृढ असतील तर त्यांची कार्यक्षमता वाढते.

१०. क्रीडा, स्पर्धांच्या माध्यमातून कर्मचारी एकमेकांशी जोडले जातात.

११. कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या, त्यावर कारवाई करा.

१२. कर्मचाऱ्यांचे सल्ले सुद्धा कधीकधीमहत्वाचे ठरतात. चांगल्या सल्ल्यांना दुलर्लक्षित करू नका. अशा सल्ल्यांचे कौतुक करा. त्यांना महत्व द्या. कर्मचाऱ्यांना फक्त आदेश देऊ नका. त्यांच्याशी कधीमधी चर्चासुद्धा करा. कामाच्या वेळेनंतर अवांतर गप्पा मारा.

कर्मचारी हाताळणीमध्ये सगळेच मुद्दे एकदम गुड बॉस सारखे नसतात… काही वेळा कडवटसुद्धा वागावे लागते.

१३. कर्मचाऱ्यांना नेहमी ‘तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे’ याची जाणीव होईल असे वागा

१४. प्रत्येक वेळी त्यांच्या मनाप्रमाणे सूट देऊ नका. तुमच्या आदेशांचे पालन करणे महत्वाचे आहे याची जाणीव करून देत चला.

१५. तुम्ही देत असलेली एखादी अतिरिक्त सुविधा हा कर्मचाऱ्यांचा हक्क नाही याची त्यांना नेहमी जाणीव राहील याची दक्षता घ्या. तुमची चांगल्या भावनेने दिलेली एखादी सुविधा त्यांना हक्क वाटता कामा नये. ज्यादिवशी त्यांना त्यात हक्क दिसेल त्यादिवशी ती सुविधा स्थगित करा.

१६. कर्मचाऱ्यांची प्रत्येक मागणी मान्यच केली पाहिजे असे नसते. ते नाराज होतील या भीतीने प्रत्येक मागणी मान्य केली तर अल्पावधीतच तुमचा व्यवसाय ठप्प होईल. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते.

१७. कर्मचाऱ्यांना डोक्यावर बसवू नका. एका मर्यादेपर्यंत प्रेमाचे, जवळीकीचे संबंध असावेत. ते संबंध मित्रत्वापर्यंत गेले तर अवघड होईल.

१८. तुमच्या अंतर्गत बाबींची चर्चा कर्मचाऱ्यांसमोर किंवा कर्मचाऱ्यांसोबत करू नका. तुमचे खाजगी जीवन त्यांच्यासमोर उघडू नका.

१९. तुम्हाला कर्मचाऱ्यांवर चिडता आलं पाहिजे आणि पुढच्या मिनिटाला राग शांतही करता आला पाहिजे. जुन्या गोष्टींचा राग कार्मचाऱ्यांवर काढू नका. कर्मचाऱ्यांवर काढायचा राग हा तात्पुरता असतो, कायमचा नाही.

२०. कर्मचाऱ्यांसोबत हसत खेळत वागा, प्रेमाने वागा, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करा, पण कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्यांचे मालक आहात हे त्यांच्या डोक्यातून जाणार नाही याची काळजी घ्या.

२१. कामाच्या ठिकाणचे वातावरण बिघडविणाऱ्या, उद्धट वागणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाका.

२२. व्यवसायाचा मालक आणि मालकाच्या खालोखाल काम करणारा कर्मचाऱ्यांचा बॉस यात फरक असतो. आपली वागणूक मालकाप्रमाणे असावी… मालकाने नेतृत्व करायचं असतं, तर बॉस फक्त आदेश देण्यासाठी असतो.

२३. ठरवून दिलेली कामे ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण होणे महत्वाचे असते, टार्गेट्स पूर होणे महत्वाचे असतात, यात कसलीही सूट देऊ नका. कर्मचाऱ्यांकडून काम करूर्न घ्यावं लागतं. त्यांच्यावर लक्ष ठेवावंच लागतं.

२४. आपल्या व्यवसायाशी कर्मचारी मनाने जोडले गेले पाहिजेत. आपली उद्दिष्टे त्यांची उद्दिष्टे झाली पाहिजेत. आपला व्यावसाय त्यांना त्यांचाही व्यवसाय वाटला पाहिजे. कर्मचाऱ्यांना आपण एका चांगल्या, आदर्शवत संस्थेचा भाग आहोत याची जाणीव झाली पाहिजे.

२५. कर्मचाऱ्यांमधे भरपूर राजकारण चालतं, त्यामुळे त्यांच्या बाबतीत कोणत्याही ऐकिव माहितीवर विश्वास ठेऊ नका. स्वतः शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. कित्येकदा त्यांच्या राजकारणात गुरफटल्यामुळे चांगले कर्मचारी आपल्यापासून दुरावतात.

कर्मचारी हाताळणीसंबंधी या काही टिप्स आहेत. व्यवसायात उतरल्यानंतर परिस्थितीनुसार आपल्याला आणखीही काही अनुभव येतातच, कर्मचारी हाताळणी हे एक कौशल्यच आहे. या कौशल्यात पारंगत होण्यासाठी अनुभव महत्वाचा ठरतो. पण सुरुवातीपासूनच या काही टिप्स फॉलो केल्यास नाक्कीच फायदा होईल…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Share
  • 128
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
    128
    Shares
  • 128
    Shares
Avatar

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!