घरबसल्या कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता हे १० व्यवसाय


घरूनच करता येतील असे व्यवसाय आता बऱ्याच जणांची गरज झाली आहे. महिलांना व्यवसाय करायचंय पण कुटुंब सांभाळून घरातूनच करता येतील अशा व्यवसायांना प्राधान्य दिले जात आहे. पण घरातून करता येतील आणि चांगले उत्पन्न देतील असे व्यवसाय आपल्यासमोर लवकर येत नाहीत. म्हणूनच इथे काही असे व्यवसाय सांगत आहे जे घरात असतानाही करता येईल आणि चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतील.

१. अॅफिलिएट मार्केटिंग किंवा रेफरल बिजनेस
अॅफिलिएट मार्केटिंग किंवा रेफरल बिजनेस म्हणजे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉरमवरून डिजिटल प्लॅटफॉरम वरून वेगवगेळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट प्रमोट करायचे. या प्रमोशनमधून संबंधित कंपनीला जो काही बिजनेस मिळतो त्यावर आपल्याला कमिशन मिळते.
उदा. आपण एखाद्या ईकॉमर्स वेबसाईटचे चे अफिलिएट असू तर आपण त्या वेबसाईटवरील कोणतेही प्रोडक्ट आपल्या सोशल नेटवर्क वर प्रमोट करू शकतो, आणि या प्रमोशनमधून त्या वेबसाईटवर वर जी काही विक्री होईल त्यावर आपल्याला कमिशन दिले जाईल.
रेफरल बिजनेस सुद्धा याच प्रकारे चालतो. एखादे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आपण आपल्या ओळखीच्या लोकांना रेफर करतो, त्यातून संबंधित कंपनीला व्यवसाय मिळतो, आणि ती कंपनी आपल्याला कमिशन देते. हे रेफरल आपण आपल्या सोशल व डिजिटल प्लॅटफॉर्म वरून करू शकतो.

म्हणजेच आपल्या मोबाईलचा वापर करून आपण चांगले पैसे कमावू शकतो. याला फुल टाईम करिअर करायचे म्हटले तर चांगले नेटवर्क हाताशी असताना महिन्याकाठी १०-२० हजार रुपये कसेही कमवता येऊ शकतात. हे काम मोबाईलवरून करता येऊ शकते, पण कॉम्पुटर असल्यास जास्त चांगले.

२. ईकॉमर्स व्यवसाय
आपण एखादे प्रोडक्ट बनवत असू किंवा ट्रेडिंग करत असू आणि ते कुरिअरद्वारे पार्सल पाठवणे सहज शक्य असेल तर आपण ईकॉमर्स व्यवसायच आधार घेऊ शकतो. हे प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या ईकॉमर्स वेबसाईट्सद्वारे विकू शकतो तसेच आपली स्वतंत्र वेबसाईट बनवून त्याद्वारे आपले प्रोडक्ट विक्री करू शकतो. या व्यवसायासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.

३. लेक्चर्स, क्लासेस
जर तुमच्याकडे एखादे स्किल असेल, कला असेल तर तुम्ही त्याचे ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. व्हिडीओ कॅलिंगच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना, क्लायंट्स ला मार्गदर्शन करणे, गाईड करणे यातूनही चांगला व्यवसाय उभा राहू शकतो.

४. युट्युबर
युट्युबवर वेगवेगळे व्हिडिओ बनवून पब्लिश करूनही आपण चांगला पैसा कमवू शकतो. चांगले कन्टेन्ट असणारे व्हिडीओ असतील तर युट्युबवर अल्पावधीतच व्हायरल होतात. एकदा स्बस्क्राइबर्स मिळायला लागल्यावर पुढे आपण फक्त चांगले व्हिडीओ अपलोड करण्याचे काम करायचे फक्त.

५. शेअर मार्केट
शेअर मार्केटमधे काम करूनही चांगले उत्पन्न मिळते. पण यामध्ये चांगला अभ्यास आवश्यक आहे. शॉर्ट टर्म ट्रेडिंगमधे चांगले उत्पन्न मिळते. अभ्यास अनुभव चांगला असेल तर इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा चांगला मार्ग आहे. बऱ्याच जणांना शेअर मार्केटमधे ट्रेडिंग करायची म्हणजे आठवडाभराचा कोर्स करायचा आणि त्याच ट्रेनरकरून डेली टिप्स घेऊन पैसे कमवायचे असंच वाटतं. पण हा दृष्टिकोन पूर्णपणं चुकीचा आहे. आपल्याला आपल्याच अभ्यासावर काम करावे लागते. शेअर मार्केट कोर्स ट्रेडिंग कशी करायची, स्ट्रॅटेजी कशी वापरावी, चार्ट स्टडी कसे करावेत, वेगवेगळे पॅटर्न कसे अभ्यासावेत यासाठी असतात. एकदा ट्रेडिंगची माहिती झाल्यावर आपल्याला स्वतःच्या बळावरच काम करावे लागते.

६. ब्लॉग वेबसाईट, न्यूज पोर्टल.
ब्लॉग वेबसाईट किंवा न्यूज पोर्टलद्वारे सुद्धा चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. वाचकवर्ग चांगला असेल तर जाहिरातीद्वारे चांगले उत्पन्न मिळते. सोशल मीडियावर चांगले नेटवर्क तयार करा आणि आपल्या वेबसाईट च्या लिंक्स त्या नेटवर्कद्वारे पब्लिश करा. वेबसाईट बनवायला जास्त खर्च येत नाही. सोशल मीडियावर नेटवर्क तयार करण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण रिस्पॉन्स मिळायला लागला कि हळूहळू उत्पन्न सुरु होईल.

७. फ्रिलांसींग बिजनेस
फ्रिलांसींग म्हणजे लोकांना एखादे काम त्यांच्याकडे जॉईन न होता किंवा त्यांच्याकडे नोकरी न करता आपल्या वेळेनुसार पूर्ण करून देणे. उदा. जर तुम्ही टाइपिंग चे काम करतअसाल, एखाद्या व्यावसायिकाला किंवा कंपनीला त्यांचा एखादा डेटा टाईप करून हवा असेल तर त्यांचे काम घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने पूर्ण करून देऊ शकता. एक प्रकारे व्हेंडरशिप सारखा हा व्यवसाय आहे, पण यात क्लायंटची सततची रिकव्हरमेंट असेलच असे नसते. ते त्यांच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला संपर्ककरतात तुम्ही त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार काम करून देता. याच प्रकारे डिझाईनिंग, सर्व्हे, App डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अशा विविध क्षेत्रात फ्रिलांसींग करता येऊ शकते. तुमच्याकडे कशासंबंधी कौशल्य आहे हे आधी निश्चित करा, कशा प्रकारे काम करणार ते निश्चित करा आणि त्याचे प्रमोशन सुरु करा.

८. सोशल मीडिया अॅडव्हर्टाईजींग बिजनेस
सोशल मीडिया जाहिरात इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वर जाहिरातीसाठी चांगल्या प्रमाणात मागणी आहे. आपल्या क्लायंटसाठी पेजेस तयार करणे, पेजेसवर रेग्युलर कन्टेन्ट अपलोड करणे, प्रमोशन करणे, कन्टेन्ट तयार करणे, जाहिराती पब्लिश करणे अशा पद्धतीने सोशल मीडिया माध्यमातून जाहिरात सेवा दिली जाते.

९. ग्राफिक्स डिझाईनिंग व्यवसाय
ग्राफिक्स डिझाईनिंग साठी मार्केटमधे भरपूर मागणी आहे. पॅम्प्लेट डिझाईन, ब्रोशर डिझाईन, लोगो डिझाईन, पॅकिंग डिझाईन, कार्ड डिझाईन अशा विविध डिझाईनिंग ची मागणी असते. गाहक एकदा जोडला गेल्यावर सर्व्हिस चांगली असेल तर कायमस्वरूपी जोडून राहतो. या कमी ग्राहकांना प्रत्यक्ष भेटायची गरज नाही. फक्त फोन कॉल वरच बारीच कामे होतात. डिझाईनिंग शिकून घेणे आवश्यक आहे.

१०. खाद्यपदार्थ
तुम्ही काही खाद्यपदार्थे बनवत असाल तर परिसरातील लोकांना ऑर्डरनुसार बनवून देऊ शकता. आपले इतर काम सांभाळून ऑर्डर येतील तसे काम करूनही चांगला व्यवसाय होऊ शकतो. काही पार्सल पाठवता येतील असे खाद्यपदार्थ बाहेर शहरातसुद्धा विकता येतील. मोठे मार्केट हाताशी आल्यामुळे धंदा सुद्धा चांगला वाढेल.

हे काही घरातूनही करता येतील आणि कायमस्वरूपी चांगले उत्पन्नही देतील असे व्यवसाय आहेत. आपापल्या अनुभवातून, माहितीतून, आसपासच्या मार्केटमधील संधी पाहून आणखीही बरेच व्यवसाय आपल्या सापडू शकतील. सध्या तरी काही व्यवसाय सुचत नसल्यास या दहा व्यवसायांचा विचार करू शकता

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

(यातील शेअर मार्केट वगळता इतर व्यवसायांसाठी तुम्हाला ‘उद्योजक मित्र’ शाखेमधे योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेत संपर्क करा. ‘उद्योजक मित्र’ शाखा शोधण्यासाठी सोबतच्या लिंक वर क्लिक करा. https://udyojakmitra.com/network-search/)

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!