प्रसिद्ध उद्योजक कार्लोस स्लिम हेलू यांचे अमूल्य विचार



‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

कार्लोस स्लिम हेलू हे मेक्सिकोमधील प्रसिद्ध उद्योजक आहेत. जगातील श्रीमंत उद्योजकांमधे त्यांची गणांना होते.

कार्लोस स्लिम हेलू यांचे काही अनमोल विचार आपल्यासाठी घेऊन आलो आहोत

इतरांच्या अभिप्रायावर आपले मोठेपण अवलंबून नसते. “माझ्या नंतर माझे अस्तित्व या नावाने कोरले जावे” असले विचार मी कधीच करीत नाही.

या अत्याधुनिक तंत्रकुशल प्रवाही गतीत प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः करणे शक्य नसते, आणि इष्टही नसते. इतर अनेकांबरोबर सहप्रवासी सहयोग हा करावाच लागतो.

तुम्ही जसजसे विकसित होत समृद्ध होत जात, तसतशी इतरांना मदत करण्याची तुमची जबाबदारी वाढत जाते.

आपला उद्योग प्रभावी व परिणामकारकतेने चालवणे हे जितके आवश्यक आहे, तितक्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीने इतरांना सर्वतोपरी साहाय्यभूत ठरत सामाजिक उन्नती साधने, हेही तितकेच गरजेचे आहे.

जेव्हा जेव्हा माही काही करण्याचा निर्णय घेतो तेव्हा तेव्हा तो निर्णय प्रत्यक्ष अंमलातही आणतो.

कंपनीतील आणीबाणीची स्थिती हि एक सत्वपरीक्षाच असते. कारण काही लोक अशा प्रतिकूलतेत काढता पाय घेतात. पण अशावेळी आम्ही मात्र त्या कंपनीत प्रवेश करायला, मदत करायला सर्वार्थाने उत्सुक असतो.

समस्यांची उकल नेमकेपणाने व त्वरित करीत सक्षमतेकडे जाणे गात्याचे असते. केवळ सांताक्लॉज सारखे देणग्या देणे आम्हाला पसंत नाही. कारण केवळ आर्थिक सहाय्य केल्याने गरिबी हटत नसते.

मी वयाच्या बाराव्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात केली होती.

गुंतवणूक न करणारा नेहमीच एक मोठी संधी गमवत असतो.

पैसा उद्दिष्ट नाही. कंपनीला वाढवणे, विकसित करणे हेच अंतिम उद्दिष्ट आहे.

स्पर्धा तुम्हाला नेहमीच उत्तम बनवण्यासाठी मदत, भलेही तुमचा स्पर्धक विजयी झाला तरी…

_

संकलन
उद्योजक मित्र

==========================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!