udyojak mitra

राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रिलायन्स ऑक्सिजन क्षमता वाढवणार


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

रिलायन्सने आपल्या जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्पातून तयार होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता १,००० टन करण्याचे जाहीर केले आहे. करोनासाथीमधे ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागणाऱ्या राज्यांना कंपनीमार्फत सध्या दिवसाला ७०० टन ऑक्सिजन नि:शुल्क पुरवला जात आहे.

गुजरातमधील कंपनीच्या जामनगर प्रकल्पामध्ये सुरुवातीला १०० टन प्राणवायू तयार केला जात होता. त्याची क्षमता आता ७०० टन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांना पुरविले जाणाऱ्या पुरवठ्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

रिलायन्सचा गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पात कच्च्या तेलाचे डिझेल, पेट्रोल आणि विमानाला लागणाऱ्या इंधनामध्ये रूपांतर केले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून देशहरातील ऑक्सिजन कमतरतेचा विचार करून आपले उत्पादन याकामी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक उपकरणे बसविली आहेत व संबंधित प्रक्रिया स्थापित केली. कंपनी सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमाचा हा एक भाग असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!