‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
कोरोना संकट काळात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची निर्माण झालेली टंचाई पाहता टाटा समूहाने पुढाकार घेत हि समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. टाटा समूहाने लिक्विड ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर्स आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यात मदत होणार आहे.
“टाटा समूहाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून लिहिले की, ‘भारतातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आवाहन कौतुकास्पद आहे आणि आम्ही टाटा समूहामध्ये कोविड -१९च्या विरोधातील लढा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी हा प्रयत्न आहे.’ आणखी दुसर्या ट्विटमध्ये कंपनीने लिहिले आहे की, टाटा ग्रुप लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर्सची आयात करीत आहे.”
“मंगळवारी टाटा समूहाने म्हटले होते की, ऑक्सिजनच्या संकटाचा विचार करता ते भारताची आरोग्य रचना मजबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे यापूर्वी एक दिवस आधी टाटा स्टीलने जाहीर केले होते की, दररोज 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्य सरकार आणि रुग्णालयांमध्ये पाठवत आहे.”
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::