ग्राहक मानसिकतेसंबंधी उपयुक्त टिप्स


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

१. ग्राहक आपल्याकडे फक्त चौकशी करायला आलेला असतो. त्याला खरेदी करायला भाग पाडाव लागतं. ग्राहक नेहमीचा असेल किंवा आपलं एखादं जनरल स्टोअर किंवा तत्सम दुकान असेल तरच फक्त तो थेट खरेदीसाठी आपल्याकडे येतो.
२. ग्राहकाला नाही म्हणण्यात स्वारस्य असतं, त्याचा नकार होकारात बदलण्यासाठी कौशल्य लागतं.
३. ग्राहकाने आपल्याकडे येण्याआधी आणखीही काही विक्रेत्यांकडे चौकशी केलेली आहे हे गृहीत धरूनच ग्राहकांशी चर्चा करावी. ग्राहक चौकस असतो. तो हुशार असतो. त्याच्या हुशारीपुढे आपले संभाषण कौशल्य कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.
४. ग्राहकाला बकरा समजू नका. 'मला लुबाडलं जात आहे' असे त्याला कधीही वाटणार नाही याची काळजी घ्या. एकदा फसवल्याची जाणीव झाल्यावर तो पुन्हा तुमच्याकडे कधीही येत नसतो. पण सोबतच आणखीही काही ग्राहक तुमच्यापासून दूर नेतो.
५. ग्राहक शांत असतो. त्याला प्रतिसाद द्यायला आवडत नाही. तुमच्याकडे नाही तर दुसऱ्याकडे असाच त्यांचा दृष्टिकोन असतो. त्याने तुम्हाला नाकारल्यानंतर, का नाकारलंय याचं उत्तर देण्यात त्यांना स्वारस्य नसतं. म्हणून ग्राहकांना नेहमी बोलते करण्याचा प्रयत्न करा.
६. ग्राहक बऱ्याचदा ऐकीव माहितीवर विश्वास ठेऊन तुमच्याविषयी मत बनवत असतो. उदा. एखादा दुकानदार महागडा आहे किंवा उद्धट आहे असं एखाद्याने सांगितलं तर ग्राहक त्यावर लगेच विश्वास ठेऊन त्या दुकानदाराविषयी आपले मत तयार करतो. डोळ्यासमोर त्याची तशी प्रतिमा तयार करतो. त्यामुळे व्यावसायिकाने आपल्या बाजूने आपली चांगली प्रतिमा ग्राहकांपर्यंत जाईल याची काळजी घ्यायची असते.
७. ग्राहकांना चांगले प्रेझेंटेशन, प्रसन्न वातावरण आवडते. दोन एकाच प्रोडक्ट ची दुकाने शेजारी शेजारी असतील तर ग्राहक त्यातील चांगले दिसणारे, चांगले प्रेझेंटेशन असणारे शॉप निवडणार हे निश्चित असते.. फक्त नेहमीचा आणि ओळखीचा ग्राहक प्रेझेन्टेशनकडे थोडे दुर्लक्ष करतो.
८. मार्केटमधे सर्व प्रकारचे ग्राहक असतात. स्वस्त पाहणाऱ्यांपासून अनेक पटींनी महाग खरेदी करणारे असतात. गुणवत्तेकडे कानाडोळा करणाऱ्यांपासून गुणवत्तेविषयी प्रचंड सजग असणाऱ्यांपर्यंत सर्व प्रकारचे ग्राहक मार्केटमधे असतात. आपल्या प्रोडक्टसाठी कोणता ग्राहक टार्गेट करायचा आहे हि ठरवून घ्या. चुकीचा ग्राहकवर्ग निवडला तर कितीही प्रमोशन केले तरी धंदा चालणारच नाही.
९. ग्राहक आपल्या व्यवसायाकडे कोणत्या गोष्टीसाठी आकर्षित होतोय याचा नेहमी अभ्यास करा. त्यांना जे आवडतंय ते सतत त्यांच्या नजरेसमोरसमोर ठेवण्याचा प्रयत्न करा. पण या प्रयत्नात महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, किंवा व्यवसायाच्या मुख्य गाभ्याकडे दुर्लक्ष करू नका.
१०. ग्राहकांना चांगले बोलणारे विक्रेते आवडतात. मधुर भाषी विक्रेत्यांसाठी ग्राहक थोडे नुकसान सुद्धा सोसण्याची तयारी ठेवतो. ग्राहक अशा बाबतीत नेहमीच उदार असतो. ग्राहकाला विक्रेत्याकडून व्यवहारावेळी फक्त मधुर संभाषणाची अपेक्षा असते. पैसा कुठे ना कुठे द्यायचाच आहे, अशावेळी ज्याच्याशी बोलताना प्रसन्न वाटतं त्याला आधी प्राधान्य दिलं जातं.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!