लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
उत्पादन क्षेत्रात उतरताना बरेच नवउद्योजक मशिनरीची किंमत पाहून त्या किमतीच्या ७०-८० % ईतर खर्च पकडून एकुन प्रोजेक्ट काॅस्ट चा अंदाज काढतात. म्हणजे मशीनची किंमत ५ लाख असेल तर एकुन प्रोजेक्ट चा खर्च ८-९ लाख असेल… बरेच मशीन विक्रेते सुद्धा फक्त मशीनची किंंत सांगून नवउद्योजकांना भुलवण्याचा धंदा करतात. पण यामुळे उद्योजक काही महीन्यातच आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असते.
कित्येक प्रोजेक्टमधे एकुन गुंतवणुकीत मशीनरीची गुंतवणुक ३०-४०% पेक्षा कमी असते. वर्कींग कॅपीटल साठी खरी गुंतवणुक आवश्यक असते. पण या खेळत्या भांडवलाचा अंदाज न आल्याने सात आठ महीन्यातच आॅर्डर हाताशी अाहेत पण पैसा उपलब्ध नाही अशी अवस्था होते. उधारी वसुलीचे आणि हाती असलेल्या आॅर्डरचे गणीत जुळत नाही. पैसा फिरत नाही. आणि पर्यायाने व्यवसाय थांबुन जातो. ठप्प होतो. किमान मागचे पेमेंट येईपर्यंत तरी काहीच हालचाल करता येत नाही.
फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधे तर हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर घडतात. प्रोसेसिंग मशिनरी बऱ्याचदा बजेटमध्ये असतात. पण रॉ मटेरियल साठी मशीन किमतीच्या ८-१० पट रक्कम लागू शकते. उदा. एखाद्या प्रोजेक्ट साठी मशीनचा खर्च ५ लाख रुपयेच असेल, पण त्याचा कच्चा माल घेण्यासाठी १५-२० लाख रुपये लागतात. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सतत बदल होत असतील तर किंमत कमी असताना मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून ठेवावा लागतो नाहीतर पुढे प्रोडक्शन कॉस्ट वाढते आणि मोठ्या कंपन्यांपुढे माघार घ्यावी लागते. फूड इंडस्ट्रीमधे बरेच उद्योजक अशा परिस्थितीमधे आर्थिक अडचणीत येतात.
प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या एकूण गुंतवणुकीचा अंदाज न घेता काम सुरु केल्यामुळे बरेच उद्योजक अडचणीत येतात.
कोणताही प्रोजेक्ट सुरु करताना यामुळेच मशीनरीच्य किमतीसोबतच बाकीचा खर्च सुद्धा पहावा. एकुन प्रोजेक्ट काॅस्ट १०० रुपये आहे, त्यातले वर्कींग कॅपीटल ७० रुपये लागतंय, आणि तुमच्याकडे वर्कींग कॅपीटलसाठी पन्नासच रुपये आहेत अशी परिस्थिती असेल तर पुढचं पुढे बघू अशा विचाराने घाईगडबडीत प्रोजेक्ट सुरु करु नका. वर्कींग कॅपीटल ७० रु लागत असेल तर तुमच्याकडे किमान ९० रु हाती असले पाहीजेत, ज्यातले २० रु ईमर्जंसी फंड म्हणुन संभाळून ठेवलेला असावा…
म्हणजेच एकुन प्रोजेक्ट काॅस्ट च्या किमान १०-२० % रक्कम ईमर्जन्सी फंड म्हणुन बाजुला काढून ठेवली पाहिजे.
किंवा तुमच्या हातात जेवढे पैसे असतील त्याच्या ८० % रकमेतच व्यवसाय सुरु करण्याचे नियोजन असावे. पण कोणत्याही परिस्थितीत खेळत्या भांडवलात तडजोड करु नका…
फक्त मशीनची किंमत पाहून एकूण प्रोजेक्ट खर्चाचा अंदाज लावू नका. आपल्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष गुंतवणुकीत जमीन अस्मानाचा फरक असू शकतो.त्यामुळे प्रोजेक्ट कॉस्ट चा संपूर्ण अंदाज घ्यावा, आणि त्यांनंतरच पुढे काम सुरु करावे. प्रोजेक्ट कॉस्ट मधे मशीन, रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल, लेबर कॉस्ट, इतर खर्च, इमर्जन्सी फंड अशा सर्व गोष्टी अंतर्भूत असतात. या सर्वांची माहिती घेऊन एकूण गुंतवणुकीचा अंदाज लावावा
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
उत्कृष्ट माहिती आहे सर. नवीन उद्योजकांना नक्कीच फायदा होईल.