व्यवसाय काय करावा यात भरपूर कन्फ्युजन होत असेल, गुंतवणुकीची क्षमता कमी असेल, मार्केटिंगच विशेष ज्ञान नसेल तर बिनधास्त जनरल स्टोअर सुरु करून टाकावं… कमीत कमी गुंतवणुकीतही सुरू करता येऊ शकता. कोणत्याही स्किल ची गरज नाही, माहितीची गरज नाही, टेक्निकल अभ्यासाची गरज नाही.दुकान थाटा, चांगल्या चांगल्या वस्तू ठेवायला सुरुवात करा, व्यवसाय सुरु होईल…
ग्राहक दुकानाच्या नावावरून दुकानाची ओळख ठरवत असतो. बेकारी मधे बेकारी प्रोडक्टच मिळतील, किराणा मधे फक्त किराणा मिळेल, स्टेशनरी शॉप मधे फक्त स्टेशनरीच मिळतील, प्लास्टिक स्टोअर मधे फक्त प्लास्टिकच्याच वस्तू मिळतील… पण जनरल स्टोअर या संज्ञेत काहीही येऊ शकत. लोकांना जे जे हवंय ते ते तुम्ही यात विकू शकता… आणि ग्राहकांनाही त्यात चुकल्यासारक काही वाटत नाही. फक्त या वस्तू घरगुती वापराशी निगडीत असल्यास उत्तम.
स्टेशनरी, प्लास्टिक, बॅग, घरगुती वापराच्या वस्तू, डेली नीड्स वस्तू, फॅशन ऍक्सेसरीज, सजावटीच्या वस्तू, खेळणी… तुम्ही काहीही विकू शकता. लोक जे जे खरेदी करू शकतील असं तुम्हाला वाटतं ते ते तुम्ही तुमच्या शो मधे ठेऊ शकता. आणि लोकांनाही त्यात वावगं काही वाटत नाही, कारण तुमचं शॉपच जनरल शॉप आहे… उलट त्यांना घरगुती वापरही निगडित जे जे हवंय ते जवळजवळ सगळंच तुमच्याकडे मिळत असेल तर ते तुमचे कायमचे ग्राहक होऊन जातात.
महत्वाचं म्हणजे हा व्यवसाय अपयशी होण्याची शक्यता खूपच कमी असते… पोटापाण्यापुरतं तरी मिळतंच, आणि व्हिजन चांगलं असेल तर अल्पावधीतच शहरातील एक मोठं स्टोअर म्हणून तुम्ही नावलौकिक नक्कीच मिळवू शकता… महत्वाचं म्हणजे भविष्यात या व्यवसायात वाढ करताना ब्रँड इमेज बनवण्यासाठी साठी करण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत… जनरल स्टोअर असूनही तुम्ही तुमच्या व्यवसायाची एक स्वतंत्र ओळख मार्केटमधे निर्माण करू शकता.
बर, हा व्यवसाय सुरु करायलाही अवघड नाही. गुंतवणूक क्षमतेनुसार तुम्ही शॉप लहान मोठं कसं सेटअप करायचा ठरवू शकता. मोठ्या होलसेल मार्केटमधून, डिस्ट्रिब्युटर्स कडून किंवा थेट कंपन्यांकडून जे जे विकलं जाईल असं वाटत ते आणून दुकानात थाटू शकता. ग्राहक यायला लागतात. विक्री सुरु होते. ग्राहकांना काय हवंय याचा अंदाज येतो. त्यानुसार तुम्ही पुढच्या खरेदीमधे काही नवीन वस्तूंची खरेदी करता. ग्राहकांची संख्या आणखी वाढत जाते… हा व्यवसाय कितीही लहान स्तरावर चालू शकतो, आणि कितीही मोठा होऊ शकतो. जनरल स्टोअर म्हणजे काहीतरी लहान व्यवसाय असे बिलकुल नाही. आपल्या प्रत्येक शहरात किमान एक तरी असे जनरल स्टोअर सापडेल ज्याची वार्षिक उलाढाल कोटींमधे आहे.
नाही झेपलं काय सुरु करावं तर बिनधास्त एक जनरल स्टोअर सुरु करा. व्हिजन चांगलं ठेवा. सामान्य स्टोअर पेक्षा काहीतरी वेगळं दिसेल अशा प्रकारे शॉप बनवा… कमी गुंतवणुकीत नक्कीच एक चांगला व्यवसाय सुरु होऊ शकेल..
_
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील