अमेरिकेतील प्रथितयश रिटेल व्यवसायिक ‘जे. सी. पेने’ यांचे यशाचे मंत्र


जे. सी. पेने (१८७५ – १९७१)
अमेरिकेतील प्रथितयश रिटेल व्यवसायिक
१८९८ साली व्यवसायाला सुरुवात केली.
१९०२ साली J. C. Penney Departmental Store ची सुरुवात केली.
१९२९ च्या जागतिक महामंदीमधे पेने यांची सुद्धा सगळी संपत्ती मातीमोल झाली होती.
परंतु त्यानंतरही त्यांनी उभारी घेतली आणि व्यवसायात जम बसवला
वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून ते मृत्यूपर्यंत व्यवसायात सक्रिय होते.

जे. सी. पेने यांचे उद्योजकांसाठी उपयुक्त अमूल्य विचार

सामान्य ग्राहक हा आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याचा विश्वास सर्वतोपरी संपादन करणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट असते. जेव्हा आपण ग्राहकाला केवळ योग्यच नव्हे तर त्याही पुढे जाऊन अधिकची सेवा देतो तेव्हा ग्राहकालाच नव्हे तर आम्हालाही समाधान लाभते. आमच्याकडे खरेदी केल्याचे विलक्षण आत्मिक समाधान आमच्या ग्राहकांना वाटते आणि हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असते. या अनुबंधाला वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.

हेतूविरहित स्मित आणि आपुलकीचे चार साधे शब्द खूप काही साधून जातात. ग्राहकाच्या मनातले नेमके ओळखणे आणि त्याला हव्या त्या वास्तूच्या जास्तीत जास्त व्हरायटीज दाखवणे हे आमचे कामाचं आहे. त्यामुळे ग्राहकाची अभिरुची, त्याची सौंदर्याची जाण तसेच त्याच्या पाकिटाची (आर्थिक) उंची आम्हाला लगेचच समजून येते. एकूणच चोखंदळ रसिक ग्राहकाला त्याला हव्या त्या सौंदर्यपूर्ण वस्तू वाजवी किंमतीत दाखवणे हा आमचा हातखंडा आहे.

पैसा तर सगळेच दुकानदार कमावत असतात, पण मला पैशाबरोबर लोकांत आनंद व समाधान वाटायचे आहे. ग्राहकाच्या चेहऱ्यावर उमलले हसू पाहण्यात मला विलक्षण आनंद वाटतो. ग्राहकाला त्याच्या जीवनाच्या व मनाच्या मागणीनुसार संतुष्ट करणे आणि हे करत असताना आपली मूल्य प्राणपणाने जपणे आम्हाला नेहमीच आवडते. त्यामुळे अनेक कुटुंबे हि आमच्या इथे मोठ्या विश्वासाने येतात आणि घरातल्या प्रमाणे वागतात.

कुठलाही उद्योग हा अखेरीस ग्राहकाशी बांधील असतो, असायलाच हवा… अनेकदा हि मूळ गोष्टच आपण विसरतो आणि मग अन्य गोष्टींना उगीचच महत्व प्राप्त होते. कधी पैसा, कधी प्रतिष्ठा तर कधी प्रदर्शनीयता वा खोटी स्तुती तसेच डुप्लिकेट माळ यांना उधाण येते. आम्ही हे सर्व आमच्या पुरते तरी थांबवले आहे.

ग्राहकाला चार पैसे वाचवण्यासाठी विक्रेत्याने थोडे जरी सहकार्य केले तर ग्राहक पुन्हा वळून त्याच्याकडेच येतो.

केवळ नफा म्हणजे व्यवसाय नव्हे. तुमची ग्राहकाभिमुखता आणि ग्राहकांप्रती असणारी निष्ठा वा तुम्ही त्याला देऊ केलेली सेवा यातून ग्राहकाचा विश्वास वाढत जातो, मग तो मोठ्या आत्मविश्वासाने तुमच्याकडे परत येतो.

जो माणूस खऱ्या अर्थाने ग्राहकाशी बांधील असतो, त्याला आवश्यक ती वस्तू, अधिकची सेवा मोठ्या स्वागतशीलतेने देतो, असा व्यवसायिक आपल्या कुठल्याही स्पर्धकाची व स्पर्धेची भीती मनात बाळगत नाही.

यश मिळविण्यासाठी नुसत्या शिखराकडे बराच वेळ बघून चालणार नाही तर त्या दिशेने आपले पहिले पाऊल उचलणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. पुढे जात राहणे महत्वाचे आहे.

तुमच्याकडे ध्येय नसेल तर तुमची पुढची दिशा भरकटले. मग तुमचे जीवन अगदीच सामान्य बनून जाईल. पण जर तुम्ही एखादे निश्चित ध्येय सारार्थने स्वीकारले तर मात्र तुम्ही नवीन काही निर्माण करू शकता.

कुठल्याही व्यवस्थेत सुव्यवस्थेला व सुसंगतीला महत्व असतेच, अन्यथा गोंधळ आकाराला येईल.

कमालीचा प्रांजळपणा व सच्चेपणा, ग्राहकांची आवड व दृष्टी याची जाण, समकालीन बाजाराच्या स्थिती-गतीचे भान आणि व्यवसायाचे पावित्र्य या चार गोष्टी कुठल्याही व्यवसायात मूलभूत असतात.

विक्री कौशल्य हीसुद्धा एक कला आहे. यात परफेक्ट होण्यासाठी सततचा सर्व आणि अभ्यास आवश्यक आहे.

_

संकलन
उद्योजक मित्र

==========================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!