भारतातील महत्वाचे स्टॉक एक्सचेंजेस


लेखक : अशोक पाडळे
======================

शेअर मार्केट मधे स्टॉक एक्सचेंजेस चे अनन्यसाधारण महत्व आहे. याच एक्सचेंजेस मधून शेअर्सचे, कमोडिटीचे व्यवहार होत असतात. आपण भारतातील विविध स्टॉक एक्सचेंज ची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय याची माहिती घेऊ
स्टॉक एक्सचेंज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्याद्वारे देशातील विविध ठिकाणी राहत असलेले लोक ऑनलाईन पद्धतीने शेअर्स खरेदी विक्री करू शकतात.
शेअर मार्केटचे सर्व व्यवहार स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातून केले जातात. म्हणून स्टॉक एक्सचेंजला शेअर मार्केट च्या विश्वामध्ये खूप महत्त्व आहे. भारतात शेअर्स साठी आणि कमोडिटी मार्केट साठी वेगवेगळे एक्सचेंज आहेत

भारतातील मुख्य स्टॉक एक्सचेंज
भारतामध्ये विविध राज्यांमध्ये स्थानिक स्टॉक एक्सचेंज आहेत. परंतु मुख्यत शेअर खरेदी-विक्री चे व्यवहार दोन स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातून केले जातात‌. एक आहे BSE आणि दुसरे आहे NSE

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) –
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा मुंबई स्टॉक एक्सचेंज या नावानेही ओळखला जातो. हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. BSE ची सुरुवात 1875 साली झालेली आहे. BSE मध्ये 5 हजार पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. BSE च्या निर्देशांकाला सेन्सेक्स असे म्हटले जाते.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) –
NSE हा भारताचा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे. NSE ची सुरुवात 1992 साली झालेली आहे. भारतामध्ये शेअर्स खरेदी व विक्रीचे सर्वात जास्त व्यवहार NSE वर होतात. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निर्देशांक निफ्टी या नावाने ओळखला जातो.

या दोन्ही एक्स्चेंज वर दररोज हजारो लाखो कोटींचे व्यवहार होत असतात. करोडो ट्रेडर्स गुंतवणूकदार या एक्सचेंजेस वर दररोज व्यवहार करतात.

_

अशोक पाडळे
शेअर मार्केट अभ्यासक, सल्लागार

8390839051
9595823239

संस्थापक
KMP Academy
शेअर मार्केटला क्लासेस व गुंतवणूक सल्लागार

शेअर मार्केट क्लासेस साठी, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु करण्यासाठी व डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी संपर्क करा…

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!