व्यवसायाच्या प्राथमिक Formalities


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसाय सुरु करताना मार्केटिंग, सेल्स, जाहिरात अशा अनेक मुद्यांवर आपण भरपूर विचार करत असतो, पण व्यवसायाच्या प्राथमिक पूर्ततांकडे मात्र आपले दुर्लक्ष होत असते. या प्राथमिक formalities व्यवसाय सुरु करताना महत्वाच्या असतात. लहान लहान गोष्टी असतात पण त्या दुर्लक्षित राहिल्यामुळे अनेकदा व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात मुख्य काम सोडून या लहान गोष्टींसाठी वेळ वाया जातो… अनेकदा काही अडचणी सुद्धा निर्माण होतात…

व्यवसायाच्या या Basic Formalities काय आहेत पाहूया थोडक्यात

१. PAN
आपले PAN असणे आवश्यक आहे. असेल तर उत्तम, नसल्यास लगेच काढून घ्या. पार्टनरशिप फर्म केली असेल तर फर्म चे PAN लगेच काढून घ्या. PAN शिवाय कोणतेही व्यवहार होऊ शकत नाहीत आणि व्यवसाय नोंदणी सुद्धा होत नाही. एक पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास स्वतंत्र PAN ची गरज असते. उदा. पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ई.

२. आधार ला आपला PAN व मोबाईल नंबर किंवा ईमेल लिंक असावा
आपल्या आधार ला आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल लिंक असणे आवश्यक आहे. तसेच PAN सुद्धा जोडून घ्यावे. हे काम सर्वात आधी करून घ्या. उद्यम रजिस्ट्रेशन करताना किंवा इतर काही कामांसाठी आधार ची गरज पडते आणि त्यावेळी आपल्या मोबाईलवर किंवा ईमेलवर OTP येत असतो. हे लिंकिंग नसल्यास रजिस्ट्रेशनच होऊ शकणार नाही.

३. सेव्हिंग अकाउंट
आपले एखादे सेव्हिंग अकाउंट असावे. याची व्यवसायाच्या दृष्टीने गरज नाही पण उद्यम रजिस्ट्रेशन करताना बँक अकाउंट डिटेल्स मागितले जातात. गंमत अशी आहे कि उद्यम नोंदणी करताना सरकार व्यवसायाचे बँक डिटेल्स मागते पण व्यवसायाच्या नावाने रजिस्ट्रेशन असल्याशिवाय बँक अकाउंट उघडत नाही. सरकार आणि बँक दोघांचे एकमेकांशी जुळत नाही पण आपण आपले सेव्हिंग अकाउंट डिटेल्स देऊन उद्यम रजिस्टर करू शकतो. हि प्रक्रिया टेक्निकली चुकीची असली तरी प्रॅक्टिकली याशिवाय उद्यम रजिस्टर होऊच शकत नाही. (यावर कुणाचे ऑब्जेक्शन असल्यास याला आटपाट नगरातील काल्पनिक संकल्पना समजून सोडून द्यावे.)

४. व्यवसाय नोंदणी
आपल्या व्यवसायाची योग्य नोंदणी आवश्यक असते. शॉप असल्यास शॉप ऍक्ट, उत्पादन किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असल्यास उद्यम, पार्टनरशिप डिड अशा विविध मार्गांनी आपल्या व्यवसायाची नोंदणी करता येते. व्यवसायाची सुरुवात हि नोंदणी कारण्यापासूनच होत असते.

५. लायसन्स
व्यवसायासाठी बऱ्याचदा नोंदणीव्यतिरिक्त काही इतर परवान्यांची गरज पडत असते. उदा. फूड लायसन्स, MPCB परवाना, फायर डिपार्टमेंट NOC ई. या लायसन्सची, परवान्यांची पूर्तता लगेच करून घेणे महत्वाचे असते. नंतर करू अशा विचाराने बाजूला ठेवाल तर कालांतराने संबंधित अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याची वेळ येते, आणि मनस्ताप होतो तो वेगळाच.

६. शिक्के
शिक्के तर सामान्यपणे विस्मृतीत जाणारी गोष्ट आहे, पण हे महत्वाचे आहे. याशिवाय व्यवसाय अवघड आहे. प्रत्येक ठिकाणी शिक्क्यांची गरज पडते. आपला प्रोप्रायटर स्टॅम्प, सील स्टॅम्प, संपूर्ण पत्ता असलेला स्टॅम्प लगेच बनवून घ्या. पार्टनरशिप फर्म च्या (किंवा एकपेक्षा जास्त व्यक्ती असलेल्या कोणत्याही व्यवसाय व्यवसायाच्या) PAN साठी शिक्का आवश्यक असतो. पार्टनरशिप फर्म असल्यास प्रोप्रायटर स्टॅम्प ऐवजी पार्टनर स्टॅम्प लागेल. तसेच व्यवसायाच्या प्रकारानुसार इतर काही शिक्के आवश्यकता असल्यास लागू शकतात, उदा. मॅनेजर स्टॅम्प, CEO स्टॅम्प ई.

७. लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड व इतर मार्केटिंग मटेरियल
आपल्या व्यवसायाचे लेटरहेड बनवून घ्यावे. व्हिजिटिंग कार्ड बनवून घ्यावे. तसेच ब्रोशर, पॉम्पलेट्स, सोशल मीडिया प्रमोशनसाठी इमेजेस सारखे मार्केटिंग मटेरियल तयार करून घ्यावेत.

८. करंट अकाउंट
PAN, नोंदणी, शिक्के झाल्यावर मग आपले करंट अकाउंट चांगल्या आणि सोयीच्या बँकेत उघडून घ्यावे.

९. डिजिटल प्रेझेन्स
व्यवसाय सुरु कल्यानंतर आपल्या डिजिटल प्रेझेन्स वर काम करावे. वेबसाईट बनवणे, B2B साईट्सवर नोंदणी, डिरेक्टरी वेबसाईट्स वर नोंदणी अशी कामे करून घ्यावीत. सोशल मीडिया वर आपल्या व्यवसायाचे अकाउंट्स सुरु करावेत.

१०. बिल बुक
आपले बिल बुक किंवा बिलिंग सॉफ्टवेअर तयार करून घ्या. व्यवसाय करताना बिल बुक आवश्यक असते.

या आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या काही Basic Formalities आहेत. व्यवसायाच्या सुरुवातीलाच यांची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे. या फॉरमॅलिटीज लहान वाटत असल्या तरी बराच वेळ आणि ऊर्जा घेतात. त्यामुळे व्यवसाय करण्याचे ठरले कि यावर लागेचच काम सुरु करावे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!