लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
यशस्वी व्यवसायासाठी विक्री प्रक्रियेचे योग्य व्यवस्थापण आवश्यक असते. यात विक्री साखळीसोबतच आणखीच काही महत्वाच्या बाबी येतात. प्रत्येकाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. विक्री व्यवस्थापनातील या महत्वाच्या बाबी पाहुयात
विक्री टीम
आपली विक्री टीम चांगली आणि प्रशिक्षित असणे आवश्यक असते. विक्री टीम चे योग्य व्यवस्थापन आवश्यक असते.
१. चांगले, अनुभवी कर्मचारी निवडा
२. पैसे वाचवण्यासाठी फक्त अनुभव नसलेले कर्मचारी घेणे नुकसानकारक असते. सरासरी ३ अननुभवी कर्मचाऱ्यांमागे किमान एक तरी अनुभवी कर्मचारी असावा. कर्मचाऱ्यांचा अनुभव आपल्याच फायद्याचा असतो. त्यांच्याकडे स्वतःचे ओळखीचे मार्केट असते, ज्याचा आपल्या व्यवसायाला लवकर सेट व्हायला फायदा होतो, तसेच त्यांना लीड्स क्लोजिंग चा पुरेसा अनुभव असल्यामुळे व्यवसायात लवकर वाढ होते.
३. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार, बोनस, इन्सेन्टिव्ह योग्य प्रकरे मॅनेज करा
४. कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्या. लीड्स जनरेशन, क्लायंट हँडलिंग, लीड्स क्लोजिंग अशा प्रत्येक बाबतीत ते चांगले प्रशिक्षित असावेत.
५. विक्री टीम ची रचना विचारपूर्वक करा. उदा. टीम लीडर, सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डिलिव्हरी पर्सन ई.
६. कर्मचाऱ्यांना लक्ष्य (targets) निश्चित करून देणे कधीही उत्तम असते.
७. विक्री टीम चा आकार एरियानुसार ठरवावा. किती परिसरासाठी किती कर्मचारी आवश्यक आहेत याचा विचार करून कर्मचारी नेमावेत.
मार्केटिंग
मार्केटिंग म्हणजे आपले प्रोडक्ट योग्य प्रकारे आपल्या अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचवणे
१. विक्री टीम कडूनच मार्केटिंग होत असते. प्रत्येक काउंटर पर्यंत प्रोडक्ट पोचवण्याचे काम विक्री टीम करत असते. हे काम डिलिव्हरी चॅनेल मार्फत केले जाते, मात्र प्लेसमेंट विक्री प्रतिनिधींमार्फतच होत असते.
२. यशस्वी मार्केटिंग साठी जाहिरातीचा चांगला सपोर्ट आवश्यक असतो. चांगले जाहिरात कॅम्पेन आवश्यक आहे.
३. प्रोडक्ट प्रेझेंटेशन महत्वाचे असते.
४. काऊंटर विक्री असेल तर प्रत्येक काउंटर वर जाहिरात झाली पाहिजे.
विक्री साखळी, वितरण
आपलीच विक्री साखळी योग्य प्रकारे मॅनेज करा. उत्पादनाच्या ठिकाणापासून ग्राहकाच्या हातात प्रोडक्ट पडेपर्यंत प्रत्येक टप्प्याचे योग्य नियोजन असावे
१. वाहतूक व्यवस्थापन करा
२. वाहतुकीच्या खर्चाचा योग्य ताळमेळ साधा. वाहतूक खर्च प्रोडक्शन कॉस्ट मध्ये असतो.
३. विक्रीच्या मार्गातील प्रत्येक टप्प्याचे नियोजन करा उदा. उत्पादन कंपनी > डिस्ट्रिब्युटर > रिटेलर > ग्राहक
४. खूप मोठ्या परिसरात विक्री होणार असेल तर डिस्ट्रिब्युशन चॅनेल चे सखोल व्यवस्थापन आवश्यक असते. गोडाऊन कुठे कुठे लागतील, तिथले व्यवस्थापन कसे असेल अशा बाबींचे नियोजन करा.
५. प्रत्येक काउंटर वर वेळेत प्रोडक्ट पोचले पाहिजेत या दृष्टीने गोडाऊन असावेत, किंवा आपला सेल्स चॅनेल सेटअप केलेला असावा.
स्टॉक मॅनेजमेंट
१. आपल्याकडे पुरेसा स्टॉक कायम उपलब्ध असणे आवश्यक आहे.
२. आपल्या मार्केटची गरज किती आहे, आणि सामान्यपणे किती ऑर्डर एकावेळी असतात याचा अंदाज घेऊन स्टॉक मेंटेनन्स आवश्यक आहे
३. डेड स्टॉक आवश्यक आहे. एका मर्यादेच्या खाली स्टॉक येणार नाही याची काळजी घ्यावी.
४. सीझननुसार ऑर्डर कमी जास्त होत असतात. त्यानुसारही स्टॉक मॅनेजमेंट आवश्यक आहे
लीड्स क्लोजिंग
लीड्स जनरेशन साठी विक्री कर्मचारी आणि जाहिरात या दोन्ही बाबी आवश्यक असतात, लीड जनरेशन नंतर मात्र आपल्या कर्मचाऱ्यांचे विक्री कौशल्यच आवश्यक असते.
१. लीड जनरेशन साठी आपल्या विक्री टीम ला चांगला जाहिरात सपोर्ट द्या
२. लीड क्लोजिंग साठी प्रशिक्षित सेल्स कर्मचारी असावेत
३. लीड क्लोजिंगमध्ये फॉलोअप घेणे आणि विक्री प्रतिनिधीला पर्याय तयार ठेवणे या दोन बाबी आवश्यक आहे.
४. लीड क्लोजिंग करताना आपल्या सेल्स कर्मचाऱ्यांची किमान २ Tier रचना असावी. योग्य रिझल्ट साठी ३ Tier रचना आवश्यक आहे.
पेमेंट्स
आर्थिक व्यवहारांचे चे व्यवस्थापन आवश्यक आहे
१. काउंटर सेल मध्ये उधारीचे व्यवहार जास्त होतात. उधारीचे योग्य नियोजन आवश्यक आहे
२. सामान्यपणे विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याकडेच उधारी वसुलीचे काम असते. डिस्ट्रिब्युटर असतील तर सामान्यपणे आर्थिक व्यवहार त्यांचेकडे असतात. कंपनीचे काम फक्त विक्री साठी सपोर्ट देणे इतकेच असतो.
३. उधारी जास्त प्रमाणात अडकून राहता कामा नये.
या काही विक्री व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी आहे. यांचे योग्य व्यवस्थापण यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक आहे. आपल्या व्यवसायाची विक्री साखळी उभी करताना या गोष्टींचा विचार अवश्य करा
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील