घरपोच लॉंड्री सर्व्हिस व्यवसाय… मोठी संधी असलेला व्यवसाय


मागील काही वर्षांत बदलेल्या राहणीमानात लोकांचा वेळ वाचवणारे आणि त्यांची कामे सहजरित्या करून देणारे व्यवसाय हमखास यशस्वी ठरत आहेत. यातलाच एक व्यवसाय आहे लॉंड्री व्यवसाय. पूर्वी ठराविक ठिकाणी इस्त्रीवाले असायचे. आपण त्यांच्याकडे कपडे इस्त्रीसाठी नेऊन द्यायचे, आणि चार दिवसांनी कपडे घेऊन यायचे. पण लोकांचे कामाचे वाढते व्याप पाहता दुकानात कपडे नेऊन देणे आणि पुन्हा घ्यायला जाणे हेसुद्धा अनेकांना त्रासदायक व्हायला लागले आहे. यामुळेच घरपोच सर्व्हसी देणारे लॉंड्री व्यवसाय चांगलेच यशस्वी ठरायला लागले आहेत. बऱ्याच जुन्या व्यावसायिकांनी आपल्या कामात बदल करून घरपोच सर्व्हिस सुरु केली आहे, आणि यामुळे नव्या परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाचा जम बसवण्यात यशस्वी सुद्धा झाले आहेत. मागील काही वर्षांपासून यात नवनवीन व्यवसाय अनोख्या ब्रँड च्या माध्यमातून सुद्धा उतरायला लागले आहेत.

घरपोच सर्व्हिस देणारा लॉंड्री व्यवसाय लहान शहरापासून मोठ्या शहरांपर्यंत सर्वच ठिकाणी मार्केट राखून आहे. प्रत्येक ठिकाणी यासाठी मार्केट उपलब्ध आहे. अगदी २०-२५ हजार लोकसंख्या असणाऱ्या लहानश्या शहरात सुद्धा यासाठी मार्केट सहज मिळू शकते.

कपडे धुणे आणि इस्त्री करणे सोपे आहे, तसेही सामान्यपणे घरगुती ग्राहक फक्त इस्त्रीच्या दृष्टीनेच सर्व्हिस पाहत असतो. ड्रायक्लिनिंग आणि इतर कामांची माहिती घेऊन आपण स्वतः सुरु करू शकतो किंवा हि कामे करणाऱ्या व्यावसायिकांकडून सर्व्हिस घेऊ शकतो. हे अंतर्गत व्यवहार कसे चालतात याच्याशी ग्राहकांना कर्तव्य नसते, तुम्ही त्यांना घरपोच सर्व्हिस देत आहात, गुणवत्ता चांगली आहे, वेळेचे पालन योग्य प्रकारे करत आहात अशा गोष्टी त्यांच्यासाठी पुरेश्या असतात.

व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला खूप गुंतवणुकीची गरज सुद्धा नाही. उलट सेटअप पेक्षा जास्त गुंतवणूक जाहिरातीलाच लागेल. अगदी सुरुवातीला स्वतः फक्त मालाची ने-आण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित ठेऊन सर्व कामे आउटसोर्स करू शकता. मोठ्या शहरात मोठमोठ्या कंपन्या फ्रँचाइजी देतात, आपण फक्त कपडे गोळा करून कंपनीच्या वर्कशॉप पर्यंत पोचवायचे, बाकी सर्व काम कंपनीचे कर्मचारीच करतात. थोडक्यात, बऱ्याच प्रकारे हा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. याचा मुख्य भाग आहे तो म्हणजे कपडे घरी जाऊन घेणे आणि वेळेत घरपोच डिलिव्हरी करणे. यात कुठेही काही कमी न ठेवणे महत्वाचे आहे. बाकी सर्व गोष्टी या व्यवसायातील अंतर्गत प्रोसेस चा भाग आहेत.

प्राथमिक वर्किंग करताना आपल्या आसपास अशी सर्व्हिस देणारे व्यवसाय किती आहेत, लोकल इस्त्रीवाले किती आहेत, परिसरात मार्केट कसे आहे, लोकांची गरज कशी आहे, आपली कामे करून देणारे सर्व्हिस प्रोव्हायडर कुठे मिळतील, प्राथमिक गुंतवणूक किती लागेल, चांगले लोकेशन कोणते असेल, जाहिरात काशी करवी लागेल अशी माहिती गोळा करा, व आपल्या नवीन व्यवसायाची सुरुवात करा

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “घरपोच लॉंड्री सर्व्हिस व्यवसाय… मोठी संधी असलेला व्यवसाय

  1. How much should be the rent for laundry mart and how can it be advertised, will the shop be able to pick up and drop from anywhere?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!