कमी गुंतवणुकीचे व्यवसाय (३)… घरगुती स्तरावरील गारमेंट विक्री


घरगुती स्तरावर गारमेंट्स विक्री करणारे कितीतरी व्यावसायिक आहेत. मोठ्या मार्केटमधून व्होलसेल मध्ये कपडे घेऊन येतात आणि आपल्याला सोसायटीमधील, कॉलनीमधील, ओळखीतील लोकांना विकतात. तसेच स्थानिक स्तरावर थोडे प्रमोशन करूनही ग्राहक मिळवतात. या व्यावसायिकांना ग्राहकही मिळून जातात. या व्यवसायात मुख्यत्वे महिलांचे प्रमाण जास्त आहे. आपल्या जवळच्या, ओळखीच्या मैत्रिणींपासूनच यांना चांगले ग्राहक मिळून जातात. पण पुरुषांनाही यात चांगली संधी आहेच. कॉलेजच्या होस्टेलमध्ये असणाऱ्या मुलामुलींना सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करण्याची संधी आहे.

याची सुरुवातही अगदी सोपी आहे. सुरवातीला एखादा ठराविक ड्रेस आणायला सुरुवात करावी. उदा. लेडीज गारमेंट्स मध्ये एखादा कपडा असेल किंवा जेंस्ट्स मधे टीशर्ट्स असतील. सुरुवातीला ८०-१० पीस आणावेत. आणताना एकदम सिलेक्टिव्ह आणावेत. आपल्या जवळच्यांना मी व्होलसेल मध्ये कपडे आणतोय हे सांगावे. हळूहळू एक एक करत ग्राहक यायला लागेल. काही पीस विकले जातील, काही राहतील. पुन्हा नवा स्टॉक आणावा, जुना नवा एकत्र करून पुन्हा विकायला सुरुवात करावी. हळूहळू रोटेशन सुरु होऊन जाईल. दररोज दोन तीन पीस विकले गेले तरी चार-पाचशे रुपये सहज सुटतात. अगदी मुंबईसारख्या शहरामध्ये क्रॉफर्ड मार्केटमधून अतिशय कमी किमतीत कपडे आणून आपल्या कॉलनीत विकणारे कितीतरी व्यावसायिक आहेत. ५० रुपयाला शर्ट आणून ३००-४०० विकतात. मी स्वतः असे काही व्यवसायिक पाहिलेले आहेत. चांगला व्यवसाय होतो. महिन्याला पाचपन्नास हजार यातूनच कमावतात. पूर्ण वेळ न देताही. हे.
आता तर बदलत्या टेक्नॉलॉजी संसाधनांच्या साहाय्याने ऑनलाईन विक्रीला सुद्धा संधी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चांगली विक्री करू शकता. विक्रीचे अनेक पर्याय आता आपल्याकडे उपलब्ध आहेत.

यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
१. माल चांगल्या गुणवत्तेचा आणि आकर्षक असावा
२. मिळेल तो माल न आणता चांगला निवडूनच आणावा
३. माल घेताना भरपूर बार्गेनिंग करून घ्यावा लागतो. त्याची तयारी ठेवा.
४. विकतानाही बार्गेनिंग करावी लागते. पण खूप नफ्याच्या मागे ना लागत योग्य किंमत आल्यास विकून टाकावा.
५. एकाच वेळी खूप माल आणू नका. थोडा थोडा करत रोटेशन करत रहा. तुम्ही दरवेळी मार्केटमधे जाऊन चांगला माल घेऊन हे तुमच्या ग्राहकांना कळाले पाहिजे. यामुळे तुम्ही स्टॉक आणला कि काय नाविन आहे हे पाहण्यासाठी लगेच गर्दी होते.
६. खूप जास्त पैसा लगेच कमवायच्या मागे लागू नका, हळूहळू व्यवसाय मोठा होईल. एकदा ग्राहक चांगला मिळायला लागल्यावर भविष्यात एखादे दुकान टाकू शकता, मोठे कापडाचे व्यापारी होऊ शकता, काहीही करू शकता, भरपूर संधी आहेत.

गुंतवणूक – एकदम थोडक्यात सुरुवात करणार असाल तर सुरुवातीला ५-७ हजार सुद्धा पुरेसे आहेत. काही जण अगदी दोन तीन पीस आणूनही विक्री सुरु करतात. पण तरी किमान ३०-५० हजार ची तयारी करून ठेवावी. ग्रामीण भागात किंवा लहानश्या शहरात रहात असाल आणि लाखभराची तयारी असेल तर तर छोटेखानी दुकान सुद्धा सुरु करू शकता. भविष्यात चांगले शॉप सेटअप करायचे असल्यास गुंतवणूक वाढेल, पण तोपर्यंत व्यवसाय सुद्धा चांगला चालेलला असेल.

फॅशन प्रोडक्ट / Accessories ला सुद्धा अशाच प्रकारे संधी आहे, त्याबद्दल लवकरच माहिती देईल.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com

या व्यवसायासंबंधी काही मार्गदर्शन हवे असल्यास जवळच्या उद्योजक मित्र शाखेमध्ये संपर्क साधावा

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!