आवळा कॅन्डी व्यवसाय – कमी गुंतवणुकीचा आणि भरपूर उलाढालीचा व्यवसाय


आवळा कॅन्डी व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीत सुरु करता येईल असा आहे. आवळा आरोग्यासाठी उयुक्त असल्यामुळे परंतु आवळा खाणे बहुतेकांना त्याच्या तुरट चवीमुळे शक्य नसल्यामुळे लोक आवळा कॅन्डी खाण्याला प्राधान्य देतात. आवळा कॅन्डी व्यवसाय सुरु करणेही अवघड असे नाही. तसेच यासाठी गुंतवणूकही जास्त लागत नाही. थोडक्यात सुरुवात करता येईल, स्थानिक स्तरावर मार्केट लगेच उपलब्ध होईल आणि उलाढालही चांगली होईल असा हा व्यावसाय आहे

प्रक्रिया
आवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावी. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रकिया ८ ते १० मिनिटे देऊन त्यामधील बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियापासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १ लिटर पाण्यात १ किलो साखर मिसळावी. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५ ते ३० एवढे कमी होते. त्यामध्ये ३५० ते ४०० ग्राम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्राम साखर मिसळून ब्रिक्स ७० डिग्री कायम ठेवावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्राम साखर घालावी आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात पहील्यांदाच २% आल्याचा रस किवा विलायची पूड मिसळल्यास चव चांगली येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात झटपट धुवून घ्यावी किंवा कापडाने पुसून घ्यावी आणि ३ ते ४ दिवस सुकवून घ्यावी. सुकलेली कॅन्डी प्लास्टिक पिशवीत भरून हवा बंद करावी.
(हि सामान्यपणे वापरली जाणारी प्रक्रिया आहे, यात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बदल करू शकता. तसेच चवीसाठी वेगवेगळे प्रयोग करू शकता.)

शासकीय पूर्तता
यासाठी आपले उद्यम नोंदणी करून घ्यावी. तसेच फूड लायसन्स काढून घ्यावे.

पॅकिंग
पॅकिंग करण्यासाठी तुम्ही मार्केटमधून रेडिमेड पाऊच विकत घेऊ शकता. किंवा गुंतवणूक जास्त करू शकत असाल तर पॅकिंग कंपनीमधून ठोकमधे तुमच्या ब्रँड च्या डिझाइनमध्ये पाऊच घेऊ शकता. एक वजनकाटा लागेल आणि एक सिलिंग मशीन. अशा प्रकारे तुम्ही पॅकिंग प्रोसेस पूर्ण करू शकता. तसेच तुम्ही १००-२०० तसेच ५००-१००० ग्राम साठी बॉटल सुद्धा घेऊ शकता. बॉटल मध्ये पॅक करणे सुद्धा जास्त सोयीचे पडू शकते.

मार्केट
स्थानिक स्तरावरच मार्केट उपलब्ध होईल. लोकांना व्होलसेल मध्ये विकू शकता तसेच पँकिंग पाऊच मध्ये विकू शकता. स्थानिक किराणा दुकान, पान टपरी, बेकरी, दूध डेअरी, अशा दुकानांमधे यांची विक्री चांगली होते. या काउंटर ला जोडून घेतल्यास चांगले मार्केट सेटअप होऊ शकते.

गुंतवणूक
अगदीच थोडक्यात म्हटले तरी १५-२० हजार रुपये गुंतवणुकीतही व्यवसाय सुरु होऊ शकेल. घरगुती स्तरावर सुरुवात करणे अवघड नाही. कालांतराने जसजसा व्यवसाय वाढत जाईल तसतसे आवळे रेट कमी असताना मोठ्या प्रमाणावत विकत घेणे, ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन, इतर भांडे मशीन मोठ्या आकाराचे विकत घेणे यासाठी गुंतवणूक वाढेल. पण सुरुवात अगदीच थोडक्यात होऊ शकते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!