व्यवसायातील यशाचा आलेख अशा प्रकारे चढता ठेवा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

१. उद्दिष्ट निश्चित करा
प्रत्येक महिन्याचे आपले व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट निश्चित करा. निश्चित केलेलेउद्दिष्ट सोपे नसावे तर जास्तीत जास्त अवघड असावे. तसेच हे उद्दिष्ट कशा प्रकारे पूर्ण होईल याचेही नियोजन करा व त्यावर योग्य अंमलबजावणी करा. नियोजन करायचे म्हणजे, अपेक्षित विक्रीसाठीकिती प्रमाणात मार्केट मध्ये प्रचार करावा लागेल, जास्तीत जास्त ग्राहक कसे जोडावे लागतील, सेल्स टीम कडून कशा प्रकारे काम करून घ्यावे लागेल, जाहिरातीचे कॅम्पेन कशा प्रकारे करावे लागेल ई.

२. कर्मचाऱ्यांना टार्गेट द्या
आपल्या सेल्स टीम ला आपल्या उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने टार्गेट द्या. त्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी सहकार्यहोईल असे स्रोत उपलब्ध करून द्या. स्रोत म्हणजे जाहिरातीचे कॅम्पेन, मार्केटिंग मटेरियल, लीड्स जनरेशन साठी सपोर्ट ई. सेल्स टीम नेहमी टार्गेट बेस वरच काम करणारी असावी. त्यांना वाटेल तेवढे काम ते करणार असतील तर तुमचा व्यवसाय वाढण्याची शक्यताच राहणार नाही. तुम्हाला अपेक्षित असलेला व्यवसाय त्यांनी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.

३. प्रत्येक महिन्याला जाहिरातीचे कॅम्पेन वाढवत चला
मागील महिन्याच्या उलाढालीच्या प्रमाणात प्रत्येक महिन्याला जाहिरात कॅम्पेन मधे वाढ करत चला. उलाढालीच्या ५-१५% पर्यंत जाहिरातीसाठी खर्च करू शकता. जाहिरातीचे कॅम्पेन करताना विचारपूर्वक करा. ग्राहक वर्ग योग्य प्रकारे टार्गेट करता येईल अशा प्रकरे जाहिरात करा.

४. नवनवीन प्रोडक्ट बाजारात आणा
ठराविक कालांतराने नवनवीन प्रोडक्ट मार्केट मध्ये आणल्यामुळे व्यवसाय वाढीसाठी फायदा होतो. नवीन प्रोडक्ट शक्य नसल्यास आहे तेच प्रोडक्ट नवीन रुपडं सादर करा. फेसलिफ्टिंगमुळे सुद्धा चांगला फायदा होतो. शॉप असेल तर शॉप मध्ये वेळोवेळी नाविन्यपूर्ण सुधारणा करत रहा.

५. कार्यक्षेत्र वाढवत चला
कार्यक्षेत्रामध्ये सतत वाढ करत राहणे आवश्यक आहे. ग्राहक संख्या वाढवण्यासोबतच परिसर सुद्धा वाढवत रहा. प्रत्येक महिन्याला आपले कार्यक्षेत्र थोडेतरी वाढवण्याचा प्रयत्न करा. १% वाढ सुद्धा फायद्याची आहे. आपले मुख्य ग्राहक रिटेल शॉप असतील तर प्रत्येक महिन्याला नवीन शॉप जोडण्याचा प्रयत्न करा.

६. चांगले कर्मचारी जोडत चला, अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा
चांगले कर्मचारी व्यवसायाला मोठं करत असतात. विक्री क्षेत्रात तसेच अंतर्गत कारभार चालवण्यासाठी सुद्धा चांगले, अनुभवी, हुशार, कार्यक्षम कर्मचारी महत्वाचे असतात. विक्री मध्ये ठराविक कर्मचाऱ्यांवर कायमस्वरूपी विसंबून राहून जमत नाही. नवनवीन कर्मचारी जोडणे फायद्याचे ठरते. प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याचे स्वतःचे मार्केट असते. त्याचा आपल्याला फायदा होतो. यासोबतच अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना जास्त काळ पोसू नका. जिथे एखादा कर्मचारी अपेक्षित काम करत नाही असे लक्षात येईल तिथे त्याला कमी करणेच फायद्याचे ठरते. आपला व्यवसाय सोशल वर्क करण्याचे ठिकाण नाही, कि लोकांना विना काम पगार देत बसावे. एखादा कर्मचारी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल, पण काही कारणाने त्याला रिझल्ट भेटत नसेल तर घाईगडबडीत निर्णय न घेता काही काळ वाट पहा. प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे कायम अपयशी ठरत नाही. पण व्यवसायात कोणत्याही परिस्थितीत फक्त कार्यक्षम कर्मचारीच असावेत.

या काही मार्गांनी आपल्या व्यवसायाचा प्रगतीचा आलेख कायम चढता राहण्यास फायदा होतो. यासोबतच आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार व्यवसाय वाढीसाठी नवनवीन मार्गांचा शोध घेत रहावे. न थांबता पुढे जात रहाणे महत्वाचे असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!