ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही पद्धती


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरात असतात. कित्येक जण नवनव्या पद्धती शोधून काढत असतात. काही पारंपरिक संकल्पनांचा वापर करत असतात. आपण इथे अशाच काही संकल्पना पाहुयात ज्या मार्केटमधे सामान्यपणे वापरल्या जातात.

१. डिस्काउंट
डिस्काउंट हि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे. व्यावसायीक आपापल्या नियोजनानुसार वेळोवेळी डिस्काउंट ऑफर करत असतात. सिझन सेल असतो, स्टॉक क्लिअरन्स असतो, स्पेशल ऑफर असते, लॉन्चिंग ऑफर असू शकते, प्रत्येकाचा आपला पॅटर्न असतो. व्यावसायिक आपल्या पद्धतीने डिस्काउंट ऑफर करत असतात. डिस्काउंट कडे पाहण्याचा ग्राहकाचा दृष्टिकोन प्रोडक्ट, फिल्ड, इंडस्ट्री नुसार वेगवेगळा असतो. त्यामुळे डिस्काउंट ऑफर करताना विचारपूर्वक करावा, तसेच डिस्काउंट वर्षभर देण्यासाठीनसतो, अशाने प्रॉडक्टची खरी किंमत डिस्काउंट करूनच आहे असा ग्राहकाचा समाज होऊ शकतो. अशावेळी त्या डिस्काउंट ला काहीच अर्थ राहत नाही. डिस्काउंट देताना फक्त किती टक्के डिस्काउंट आहे हे सांगून फायदा नाही, मूळ किंमत किती आहे आणि डिस्काउंट करून किंमत किती आहे हेही ग्राहकांना कळू द्या. ग्राहक मुख्यत्वे पैशात हिशोब करत असतो, टक्केवारीत नाही.

२. प्रसिद्ध चेहरे किंवा मॉडेल्सला ब्रँड अँबेसेडर बनवणे
प्रसिद्ध चेहरे, सेलिब्रिटी, मॉडेल्स यांना जोडल्यामुळे ग्राहकांचे लक्ष ब्रँड कडे आकर्षिले जाते. किमान प्राथमिक स्तरावरील एन्क्वायरी वाढतातच. पण यामधे प्रोडक्ट क्वालिटी महत्वाचीच असते. कारण सेलिब्रिटी पाहून ग्राहक पहिल्यांदा येईल, पण दुसऱ्यांदा येण्यासाठी क्वालिटीचीच गरज पडेल. सेलिब्रिटींसाठी दरवेळी लाखो रुपयेच लागतात असे काही नसते. ओळखीचा चेहरा असलेले सेलिब्रिटी कित्येक वेळा बजेट मध्ये मिळून जातात. हि थोडी खर्चिक पद्धत आहे, पण यामुळे व्यवसायात वाढ होण्यास चांगली मदत होते.

३. काही संकल्पना किंवा कॅम्पेन सुरु करणे
बऱ्याच कंपन्या काही नवीन संकल्पना किंवा कॅम्पेन घेऊन मार्केटमधे उतरतात. हे कॅम्पेन उत्पादनाचे नसते, तर फक्त कंपनीच्या ब्रँड ला प्रमोट करणारे असते. कंपनीच्या ब्रँड ची सकारात्मक प्रतिमा ग्राहकांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी असते. पूर्वी हि स्ट्रॅटेजी फक्त मोठ्या कंपन्या वापरताना दिसून येत असे पण आता शहर किंवा जिल्हा स्तरावर सुद्धा अनेक व्यवसायीक अशा प्रकारे कॅम्पेन करताना दसून येतात.

४. भावनिक जाहिरातबाजी
ग्राहकांना भावनिक जाहिराती आवडतात. भावनिक मुद्द्यांकडे लोक जास्त आकर्षित होतात. बऱ्याचदा व्यवसायाशी निगडित भावनिक स्टोरी थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रकाशित करून ग्राहकांना भावनिकदृष्ट्या ब्रँडशी जोडले जाते. याचा विक्रीसाठी नक्कीच चांगला फायदा होतो. ग्राहकांच्या तक्रारी सुद्धा कमी होण्यास मदत होते. ईमोशनमुळे प्रमोशन चांगलं होतं.

५. सेलिब्रिटी प्रसिद्ध व्यक्ती यांचे ब्रँड सोबत फोटो किंवा व्हिडीओ प्रकाशित करणे
प्रसिद्ध व्यक्तींकडे जे ब्रँड दिसतात ते आपसूकच ग्राहकांकडून जास्त खरेदी केले जातात. अशा व्यक्तींना ब्रँड अँबेसेडर न बनवता फक्त ते एखाद्या ठराविक ब्रँड च्या वस्तू वापरतात हे ग्राहकांना दर्शवणे एवढाच उद्देश असतो. कित्येक ब्रँड एखाद्या सेलिब्रिटीला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या प्रोडक्ट चे अप्रत्यक्ष प्रमोशन करायला सांगत असतात. अप्रत्यक्ष म्हणजे ते प्रोडक्ट अशा प्रकारे दाखवले जात असते कि पाहणाऱ्याला संबंधित सेलिब्रिटी ते प्रोडक्ट नेहमी वापरतात असे वाटावे.
काही लोक यापुढे जातात. ठराविक काळाने काहीतरी निमित्त काढून एखाद्या सेलिब्रिटीला किंवा प्रसिद्ध व्यक्तीला भेट देतात, त्यांना आपले प्रोडक्ट भेट देतात व त्या भेटीचे फोटो काढून त्याचा आपले प्रमोशनसाठी वापर करतात. फोटो काढताना आपला ब्रँड समोर दिसेल अशा प्रकारे प्रोडक्ट ठेवलेले असते. हि स्ट्रॅटेजी फार कामाची ठरते, फक्त हि अप्रत्यक्ष जाहिरातबाजी असेल तरच चालू शकते, अन्यथा कायदेशीर कारवाईची शक्यता असते.

६. कंपनीच्या संस्थापकाला, प्रमोटरला, डायरेक्टरलाच ब्रँड बनवणे
बऱ्याचदा एखाद्या कंपनीच्या संस्थापकाला किंवा प्रमोटरलाच ब्रँड बनवण्यासाठी, सेलिब्रिटी बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. उदा. एलन मस्क, स्टीव्ह जॉब्ज ई. हा ब्रँड बनवताना संबंधित व्यक्तीविषयी मार्केटमधे विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतः व्यावसायिक जर प्रसिद्ध व्यक्ती असेल, किंवा विश्वासार्ह असेल तर त्यांच्याविषयी ग्राहकांना आकर्षण वाटेल आणि पर्यायाने त्यांच्या प्रोडक्टकडे ग्राहकांचा ओढा आपोआपच वाढेल. स्थानिक स्तरावर सुद्धा व्यावसायिक स्वतःची ब्रँड व्हॅल्यू वाढवून आपल्या व्यवसायाला त्याचा फायदा मिळवून देऊ शकतात

७. अप्रत्यक्ष मार्केटिंग
कित्येकदा अप्रत्यक्षपणे प्रोडक्ट माथी मारले जातात. वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या प्रोडक्ट ची क्रेझ निर्माण केली जाते, आणि मग ते प्रोडक्ट मार्केटमधे मोठ्या प्रमाणात उतरवले जाते. या क्रेझ मुळे ग्राहक त्या प्रोडक्ट कडे आकर्षित झालेला असतोच. मग मार्केटमधे ते प्रोडक्ट आले कि त्यावर ग्राहकांच्या उड्या पडतात. हि अप्रत्यक्ष मार्केटिंग अनेक स्तरावर केली जाते. लहान व्यवसायापासून ते मोठमोठ्या उद्योगांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील व्यावसायिक याचा फायदा उठवताना दिसून येतात.

८. सिम्बॉलिक मार्केटिंग
प्रोडक्ट ला ठराविक प्रतिमा जोडल्याने त्याविषयी ग्राहकांचे आकर्षण वाढते. एखाद्या प्रोडक्ट ला वापरणे स्टेट्स सिम्बॉल वाटते, तर एखाद्या प्रोडक्टला वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते. कंपन्या अशा प्रकारे आपल्या प्रोडक्टला सिम्बॉलिक आयडेंटिटी देतात, ज्यामुळे ग्राहकांच्या मनात त्यासंबंधी आकर्षण निर्माण होते.

९. आकर्षक आणि भव्य सेटअप
रिटेल शॉप्स मधे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक आणि भव्य सेटअप ला प्राधान्य दिले जाते. शॉप लहानसे असले तरी आकर्षक असल्यास ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. तसेच मोठे शॉप्स त्यांच्या भव्य सेटअप मुळे आपोआपच आकर्षक वाटतात. गेल्या काही वर्षात अचानक मार्केटमधे आलेले काही ब्रॅण्ड्स त्यांच्या भव्य सेटअप मुळे ग्राहकांना अल्पवधीतच नामांकित ब्रॅण्ड्स वाटायला लागले आहेत.

१०. चर्चेत राहण्याची पद्धती
बऱ्याच कंपन्या विविध मार्गांनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. मार्ग कोणताही असो, चर्चेत राहणे महत्वाचे हाच विचार असतो. सततच्या चर्चांमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते. यातूनच कालांतराने ब्रॅण्डविषयी सुद्धा आकर्षण निर्माण होण्याची शक्यता असते. पण यात नकारात्मक चर्चा होण्याची शक्यता असते, आणि यामुळे ब्रँड ला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी सुद्धा आधी भरपूर काही प्लॅनिंग करावं लागतं.

११. आपली सक्सेस स्टोरी प्रमोट करणे
काही ब्रँड्स आपली सक्सेस स्टोरी मार्केटमधे प्रमोट करून ग्राहकांचे आपल्याप्रती आकर्षण वाढवण्याचे काम करतात. यशस्वी लोकांकडे आकर्षित होणे हा आपला मूळ स्वभाव आहे, हाच स्वभाव व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. एखाद्या व्यवसायाचे यश खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करून तो किती यशस्वी आहे, भव्य आहे, जगावेगळा आहे, इतरांपेक्षा वर आहे हे दाखवून दिले कि ग्राहकांना त्या व्यवसायाचे ग्राहक होण्यात एक वेगळेच समाधान मिळत असते. ग्राहक नकळतपणे त्या ब्रँड कडे आकर्षित होत जातो.

१२. क्रिएटिव्ह कॅम्पेन करणे
इतरांपेक्षा वेगळे वाटणारे, काहीतरी वेगळे देऊ इच्छिणारे क्रिएटिव्ह कॅम्पेन ग्राहकांना आकर्षित कारण्याचे काम करत असते. यात अनेक कार्यक्रम येऊ शकतात, जाहिरातीचे कॅम्पेन असू शकते किंवा इतर काही. लहानातील लहान व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत प्रत्येकाला यात संधी आहे. मी एका वडापाव व्यावसायिकाला जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी ‘कपल वडापाव’ (Couple) सुरु करण्यासाठी सल्ला दिला होता, तो ग्राहकांना चांगलाच आवडला होता. ग्राहकांची संख्या त्यामुळे चांगलीच वाढली होती. मॅक्डोनाल्ड्स च्या शॉप बाहेर एक जोकर बसवलेला असतो, मूर्ती असते. ३०-४० वर्षांपूर्वी मॅक्डोनाल्ड्स च्या एका फ्रॅंचाईजी ने आपल्या प्रमोशनसाठी जोकरचा वापर केला होता आणि ते कॅम्पेन प्रचंड यशस्वी झाले होते, त्यातून हि संकल्पना पुढे आली. व्होडाफोन चे झूझू (ZooZoo) कॅम्पेन आठवत असेल. क्रिएटिव्ह कॅम्पेन चे ते एक चांगले उदाहरण होते. अशा काही क्रिएटिव संकल्पनांमुळे ग्राहक आकर्षित होण्यास चांगला फायदा होतो.

ग्राहकांना आकर्षित करण्याच्या या काही सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहे. यासोबत आपण व्यवसाय करत असताना स्थानिक परिस्थितीनुसार मार्केटिंग कॅम्पेन राबवत असतोच, यातूनही अनेक नानाविध संकल्पना समोर येत असतात. अशा नवनवीन संकल्पनांवर काम करून त्यांना आणखी चांगल्या प्रकारे डिझाईन केल्यावर त्यांचाही प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 1303 - Today Page Visits: 1

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!