उद्योजकांसाठी उपयुक्त ‘ब्रायन ट्रेसी’ यांच्या बिजनेस टिप्स


नवनवीन ग्राहक मिळवणे आणि त्यांना टिकवणे हा कुठल्याही व्यवसायाचा हेतू असतो

एखादी कंपनी तिच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये किती प्रभावी ठरत आहे हे मोजण्याचे एक माप म्हणजे तिने किती नफा कमवला आहे हे बघणे होय

नफा हा पुढील काळासाठी आणि आत्ताचा खर्च भागवण्यासाठी असतो. तो व्यावसायिक खर्चासाठीच असतो.

ग्राहकांचे समाधान हे माणसांच्या परस्पर संबंधातून मिळते

चांगल्या कंपन्यांतून उत्तम लोकांनाच ठेवले जाते

मानव संसाधनाच्या माध्यमातून ग्राहकांना समाधान देण्याची प्रक्रिया अधिकाधिक चांगली करणे हि व्यवस्थापनाची मुख्य भूमिका असायला हवी

कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त समाधान देणाऱ्या गोष्टी करण्यात ग्राहकाचा रोख असतो

ग्राहक नेहमीच निष्ठुर असतात. त्यांना ज्या कंपनीकडून उत्कृष्ट सेवा मिळते त्यांना ते गौरवतात आणि ज्यांच्याकडून त्यांना वाईट वागणूक मिळते त्यांना ते पायदळीही तुडवतात

ग्राहक नेहमीच त्याला हवी असलेली गोष्ट/वस्तू/सेवा मिळवण्यासाठी सहज, सुलभ मार्गांचा अवलंब करण्याचा समजूतदारपणा दाखवत असतो

ग्राहक हा केंद्रस्थानी ठेऊनच व्यवसायाचे नियोजन, त्याचा विचार केला जातो

ग्राहक कमीतकमी किमतीत उच्चतम दर्जाची मागणी करतच राहणार आहे

ग्राहक त्याला हव्या त्या दर्जाच्या वस्तूसाठी मागेल ती किंमत द्यायला तयार असतो

एखादी वस्तू कशा प्रकारे विकली जाते, प्रत्यक्ष हातात दिली जाते व त्यात सातत्य कसे टिकविले जाते आणि तिचा स्वतःचा दर्जा काय आहे, या सर्व गोष्टी ‘दर्जा किंवा मोल’ यात अंतर्भूत आहेत.

ग्राहकांच्या दृष्टिकोनावर कंपनीच्या गुणात्मक दर्जेच्या प्रमाणात कंपनीची नफा मिळवायची पात्रता सिद्ध होत असते

आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने नवनिर्मिती आणि सुधारणा करणे आवश्यक आहे

नवनवीन पद्धतींच्या वापरामुळेच उद्योगधंद्यातील अडथळ्यांचा बांध फुटतो व पाणी वेगाने वाहते होते. काहीतरी नवीन कृती केल्याने, जलदगतीने, अभिनव आणि अधिक कार्यक्षमतेमुळेच बाजारपेठेतील कोंडी फोडता येते

तुमचे सर्वात जास्त नफा मिळवून देणारे उत्पादन, जास्तीत जास्त विक्री होणारे उत्पादन पुढील ३ ते ५ वर्षात बाजारातून नाहीसे होणार आहे, त्याची गरज संपणार आहे, अशी कल्पना करा. त्याची जागा घेणारे कोणते उत्पादन किंवा सेवा तुम्ही विकसित कराल?

प्रत्येक व्यवसायात महत्वाची समजली जाणारी वेगवेगळी यशाची शिखरे असतात आणि त्यावरून तुम्ही यशस्वी झालात कि अपयशी हे ठरते

प्रत्येक व्यक्तीमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे महत्वाचे घटक अस्तित्वात असतात आणि त्या घटकांच्या उत्कृष्ट कामगिरीवर त्या व्यक्तीचे व्यावसायिक भवितव्य ठरत असते

स्पर्धात्मक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी एखादी वैशिष्ट्यपूर्ण वस्तू अथवा सेवेची गरज असते; जेणेकरून एखादे विशिष्ट काम उत्कृष्टरित्या करता येईल आणि ग्राहकाची नेमकी गरज समाधानकारक पद्धतीने भागवता येईल.

कंपनीला जर नेत्रदीपक प्रगती साधायची असेल तर तिने ग्राहकांचे वर्गीकरण किंवा बाजारपेठेची विभागणी करणे आवश्यक आहे.

बऱ्याचशा कंपन्या अपयशी ठरण्याचे कारण हेच असते कि त्या चुकीच्या वस्तू चुकीच्या मार्गाने व चुकीच्या ग्राहकांपुढे मांडतात

तुम्ही ज्या ग्राहकांची विभागणी केली आहे, त्यांना एकनिष्ठतेने वस्तू किंवा सेवा विकणे, यातच तुमचे यश दडले आहे. तुमचे जे वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे, त्यायोगे तुमचे एकमेवद्वितीय असे उत्पादन किंवा सेवा देऊन तुम्ही त्या ग्राहकाचे जास्तीत जास्त हित, फायदा जपला पाहिजे. त्यामुळेच तुम्ही बाजारपेठेतील यश सिद्ध करणार आहात.

एका विशिष्ट वर्गातील ग्राहकांना त्याच विशिष्ट बाजारात, प्रभुत्व संपादन करून जास्तीत जास्त उत्तम उत्पादन उपलब्ध करून देणे, हि उत्कृष्ट व फायदेशीर ठरणारी क्लर्यप्रणाली किंवा व्यूहरचना आहे.

_

संकलन
उद्योजक मित्र

==========================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!