योग्य व्यवहार केला तर ग्राहक पैसा देणारच आहे, मग त्याला लुबाडण्याचा दृष्टिकोन का ठेवायचा?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

नगर शहरापासून जवळच एक हॉटेल होतं. १२-१५ किलोमीटर लांब होतं. हॉटेलचं लोकेशन एकदम छान होतं. मोठं गार्डन, मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असे बरेच काही होते. खास कार्यक्रमांसाठी लोक तिथे हमखास जायचे. वाढदिवस असेल, एखादी पार्टी असेल अशावेळी शहरापासून थोडे लांब असल्यामुळे लोक या हॉटेलला प्राधान्य द्यायचे. आम्हीसुद्धा बऱ्याचदा गेलो होतो.

सुरुवातीला हॉटेल चांगले चालत होते. दिवस मावळल्यानंतर ७०% टेबल नेहमीच भरलेले असायचे. पण हळूहळू हॉटेल चालकाने सरळ मार्गाने धंदा करायचे सोडून वाकडा मार्ग सुरु केला. प्रत्येक ग्राहकाला सक्तीने पाणी बॉटल घ्यायला लावायला लागला. ग्राहकांनी फिल्टरचे पाणी नाही का असे विचारल्यावर सरळ नाही म्हणून सांगायचे. त्यात कधीकधी त्याचे वेटर ‘काय भिकाऱ्यासारखं फुकटचं पाणी मागतोय’ अशा अविर्भावात तोंड वाकड करून ग्राहकाकडे बघायचे. दोघे तिघे असतील तर हॉटेलमध्ये जास्तीत जास्त २ बॉटल लागतात, ४० रुपये काही वाटत नाही. पण या हॉटेलमध्ये सामान्यपणे १०-१५ जण यायचे. आम्हीसुद्धा जेव्हा खूप जण असू तेव्हाच जात असत. अशावेळी कमीत कमी ८-१० बॉटल विकत घ्याव्या लागायच्या. म्हणजे किमान २०० रुपयांचं बॉटलचंच बिल व्हायचं. काही वेळा हे बिल ४०० पर्यंत गेलेलं आहे, हे आमच्याचक बाबतीत घडलेलं आहे.

हि चुकीची आणि लुबाडणुकीची प्रॅक्टिस सुरु झाल्यानंतर हळूहळू ग्राहक कमी व्हायला लागले. आम्ही सुद्धा यानंतर एक दोन वेळा गेलो, पण बॉटलचं २००-२५० रुपयांचं बिल बघून हिरमोड व्हायला लागला. हा आपल्याला लुटतोय आणि आपण लुटण्यासाठी ईथं येतोय असं वाटायला लागलं. शेवटी आम्ही सुद्धा जाणं बंद केलं. यानंतर वर्षभरातच हॉटेल पूर्णपणे बंद झालं.

आमच्या घराजवळच एक भजे, वडापाव वाला होता. भजे इतके भारी असायचे कि ते घेण्यासाठ लोक रांगेत उभे राहायचे. मी स्वतः रांगेत उभे राहून कितीतरी वेळा भजे घेतले आहेत. पण धंदा वाढला आणि भाऊंच्या डोक्यात हवा गेली. मला ग्राहकांची गरज असा दृष्टिकोन वाढायला लागला. सुरूवातीला ग्राहकाला गरम भाजेच द्यायचा, पण हळूहळू भाजे गार मिळायला लागले. यानंतर त्याने एक चांगले दुकान घेऊन तिथे व्यवसाय चालू केला. तिथे गेल्यानंतर तर ग्राहकांची गरजच नसल्यासारखा वागायला लागला. आपण त्याच्याकडे जावं , भजे गरम आहेत का पहावं, ते गारच असतात, मग त्याला भजे गरम नाहीत का असं विचारवं, आणि त्याने तोंड वाकड करून ‘भजे गरम मिळत नाहीत, असेच मिळतात’ असं उत्तर द्यावं. ते गार भजे घेण्यापेक्षा माघारी फिरण्याचा पर्याय आपल्याला जास्त योग्य वाटतो. आता या भाजेवाल्याकडे रांग तर दूरच काउंटरवर सुद्धा लवकर कुणी दिसत नाही.

धंदा थोडा चांगला चालायला लागला कि ‘आता अपूनीच भगवान है’ असा काही व्यावसायिकांचा अविर्भाव असतो. मला आता कुणाची गरज राहिलेली नाही, मी ग्राहकांना असा बोटावर फिरवतो कि नाही बघा, अशा अविर्भावात धंदा केला जातो, आणि हळूहळू सगळंच ठप्प चायला लागतं. धंद्यातल्या या अक्षम्य चुका या कॅन्सर सारख्या असतात. सुरुवातीलाच सावरलात आणि सुधारणा केली तर ठीक नाहीतर या चुका धंदा कधी पोखरून काढतात कळतही नाही. व्यवसाय हळूहळू कमजोर व्हायला लागतो, आणि शेवटी बंद करण्याव्यतिरिक्त पर्याय रहात नाही.

तुम्ही काम चांगलं करत असाल तर ग्राहक पैसा देतोच. त्याला चांगलं प्रोडक्ट मिळतंय, चांगली सेवा मिळतेय अशावेळी तुम्हाला नाही म्हणण्यासाठी त्याच्याकडे कारण नाही, मग सगळं चांगलं चालू असताना उगाच त्याला ट्रॅप करून पैसे काढायचे, माजल्यासारखं वागायचं याची गरज काय आहे? ग्राहकाला जेव्हा आपल्याला लुटलं जातंय, आपल्याला गृहीत धरलं जातंय असं वाटायला लागतं तेव्हा तो पर्याय शोधायला लागतो, आपल्यापासून दूर जायला लागतो.

तुम्ही प्रोडक्ट चा रेट जास्त लावा, त्याचे समाधानकारक कारण सांगा, ग्राहक खरेदी करेल, पण त्याऐवजी ग्राहकाला कुठंतरी जबरदस्ती करून त्याच्या खिशातून पैसा काढण्याचा प्रयत्न कराल तर ग्राहक नाराज होईल. याच प्रकारे ग्राहक ज्या गुणवत्तेसाठी तुमच्याकडे येतोय ती गुणवत्ता न देता आहे ते घ्या असे म्हणालात तर ग्राहक नाराज होणारच आहे. आणि अशा गोष्टींमुळे नाराज झालेला, दुखावलेला आणि दुरावलेला ग्राहक पुन्हा जोडणे हि बिलूल सोपी गोष्ट नाही. ग्राहकाला गृहीत धरू नका, त्याला लुबाडण्याचं साधनही समजू नका. योग्य व्यवहार करा, तो पैसा देणारच आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 1685 - Today Page Visits: 1

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “योग्य व्यवहार केला तर ग्राहक पैसा देणारच आहे, मग त्याला लुबाडण्याचा दृष्टिकोन का ठेवायचा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!