व्यवसायात कधीतरी काहीतरी करून फायदा होत नाही. सतत काहीतरी करावं लागतं.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

बरेच जण एखादं जाहिरातीच कॅम्पेन करतात, पुढचे दोन तीन महिने शांत राहतात, पुन्हा अंगात आल्यासारखं एखाद मोठं जाहिरातीच कॅम्पेन करतात पुन्हा चार सहा महिने एकदम शांत राहतात. अशाने रिझल्ट कधी मिळतंच नाही. यापेक्षा दररोज थोडीथोडी जाहिरात करत राहील, एकेका परिसरावर लक्ष देत राहिलं तर हळूहळू त्याचा परिणाम दिसायला लागतो. आणि या दररोजच्या जाहिरातीने संचय वाढत जातो, हळूहळू नकळतपणे ग्राहक वाढायला लागतो. वर्ष दोन वर्षांनी मागे वळून पाहिलं तर लक्षात येत कि आपण खूप मोठी मजल मारली आहे.

प्रेझेंटेशन मधेही अशाच प्रकारची चूक होते. कधीतरी अचानक नवीन काहीतरी करण्याचं सुचतं, आणि काही महिन्यांसाठी पुन्हा सगळं शांत शांत असतं. दुकान असेल तर दोन चार महिन्यातून अचानक दुकान साफसूफ करायचं सुचतं, लगेच सगळी साफसफाई करून लहानमोठी लाइटिंग करून दुकानाला आकर्षक बनवलं जातं, आणि पुन्हा पुढचे चार सहा महिने त्याच्या सफाईकडे लक्षच दिले जात नाही, त्या लाईटच्या माळेतले निम्मे दिवे बंद झाले तरी लक्ष जात नाही. दुकानात जळजळमटे झाले तरी लक्ष जात नाही.

नवीन संशोधनांमध्येही असंच होतं. व्यवसायात सतत नावीन्याच्या शोधात राहायचं असतं. पण आपण सतत नाही तर कधीतरी नाविन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आपल्या हाती कधीच काही लागत नाही. फिरून पुन्हा जुन्याच गोष्टींवर कायम राहण्याची वेळ येते. ग्राहकांनाही नवीन काही देण्याचा प्रयत्न केला जात नाही. फक्त दसरादिवाळी आली कि सुचत काहीतरी वेगळं करुत. इतर वेळेस सगळं भकास सुनसान होऊन जातं.

रोपट्याला एकदाच खूप सारं पाणी दिल्याने ते मोठं होत नाही त्याला दररोज, एक दिवसाआड, दोन दिवसाआड, थोडंथोडं पाणी द्यावं लागतं, त्याची सतत मशागत करावी लागते, तेव्हा कुठे जाऊन ते हळूहळू मोठं व्हायला लागतं, आणिएक दिवस प्रचंड मोठा वृक्ष बनतं. व्यवसाय हा रोपट्यासारखाच असतो. इथे सतत कृतिशील राहावं लागतं. सातत्य हवं असतं. कधीतरी काहीतरी करून फायदा होत नाही. सतत काहीतरी करावं लागतं. दररोजची लहान लहान कामे एका काळानंतर मोठ्या स्वरूपात आपल्याला परतावा देत असतात.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 1934 - Today Page Visits: 1

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!