HDFC चं होणार HDFC बँकेत विलीनीकरण


Housing Development Finance Corporation (HDFC) ने आज सोमवारी जाहीर केलंय की, ते आता एचडीएफसी बँकेमध्ये विलीनीकरण करणार आहेत. HDFC च्या बोर्डाने एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्स लिमिटेड या त्यांच्या संपूर्ण मालकिच्या उपकंपन्यांचे एचडीएफसीमध्ये विलीनीकरण करण्यास परवानगी दिली आहे.

या विलीनीकरानंतर Housing Development Finance Corporation (HDFC) हे एचडीएफसी बँकेच्या स्टॉक्समधील 41 टक्के हिस्सा संपादन करेल.

एचडीएफसी-एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण FY24 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एचडीएफसीनं सांगितलंय की, त्यांच्या या प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा housing loan portfolio तयार करता येईल आणि त्यांचा सध्याचा ग्राहक आधार आणखी वाढेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!