तीन वर्षांपासून बंद असलेल्या जेट एअरवेज ची सेवा लवकरच सुरु होणार सेवा


तीन वर्षांपासून बंद असलेली जेट एअरवेजची सेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेट एअरवेज चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भरारी घेईल, असे म्हटलं आहे.

१०० पेक्षा जास्त विमानांचा ताफा आणि २३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या जेट एअरवेज वर २६ बँकांचे कर्ज होते. जेट एअरवेजला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समूहाने (Consortium) कृती आराखडा (जेट २.०) तयार केला आहे. या समूहाचे नेतृत्व कालरॉक कॅपिटल आणि उद्योजक मुरारी लाल जालान यांच्याकडून करण्यात येत आहे. या समूहाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने २०२१ मध्ये जेट एअरवेजचा प्रस्ताव मंजुर केला होता.

जेट २.० मध्ये जेट एअरवेजला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. जेट एअरवेजचे हवाई मार्ग, स्लॉट पुन्हा पूर्ण क्षमतेने वापरले जाणार आहेत. मात्र या कृती आराखड्याला राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (NCLT) आणि इतर आवश्यक परवानगी मिळावी यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. एप्रिल अखेर कंपनीला उड्डाणाची परवानगी मिळेल, असा विश्वास कपूर यांनी व्यक्त केला आहे. कंपनीकडे अनेक विमान आहेत त्यातील निवडक विमानांच्या माध्यमातून सेवा सुरु केली जाईल, असे कपूर यांनी सांगितले.

जेट एअरवेजने २५ वर्षे सेवा दिली. या प्रदीर्घ सेवेत कंपनीने हवाई क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केलं होते. ते गतवैभ पुन्हा मिळवून देण्यासाठी नवे संचालक मंडळ प्रयत्न करेल. देशांतर्गत सेवेबरोबरच लवकरच आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करण्याची योजना आहे. २०१९ पासून दिवाळखोरीमुळे जेट एअरवेजची सेवा बंद आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!