रशिया-युक्रेन संघर्षामुळे उत्पादकांनी वाढत्या खर्चावर खर्च करणे सुरू केल्यामुळे या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत सिमेंटच्या किमती २५-५० रुपयांनी वाढू शकतात, असे क्रिसिलने एका अहवालात म्हटले आहे.
“गेल्या १२ महिन्यांत प्रति पाेते ३९० रुपयांपर्यंत वाढल्यानंतर देशांतर्गत सिमेंटच्या किमती एप्रिलमध्ये २५ – ५० रुपयांपर्यंत वाढणार आहेत कारण उत्पादकांनी रशिया-युक्रेन संघर्षामुळे वाढत्या खर्चाचा भार ग्राहकांकावर टाकण्याचा विचार केला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.याशिवाय, रशिया-युक्रेन संघर्ष, ऑस्ट्रेलियातील प्रमुख खाण क्षेत्रातील हवामानातील व्यत्यय आणि देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी इंडोनेशियाने कोळशाच्या निर्यातीवर घातलेली बंदी यांसह विविध कारणांमुळे आंतरराष्ट्रीय कोळशाच्या किमतीही वाढल्या आहेत. वीज आणि इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रस्त्यावरील मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे, ज्याचा वाटा सिमेंट वाहतुकीच्या ५०टक्के आहे. मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमती प्रति लिटर २५ रुपयांनी वाढल्या आहेत, तर किरकोळ डिझेलच्या किमतीही वाढल्या आहेत. मार्चच्या मध्यापासून त्यात १४ पट वाढ झाली आणि एकूण वाढ १० रुपये प्रति लिटर झाली,” असे त्यात म्हटले आहे.
क्रिसिलच्या संशोधन संचालक हेतल गांधी यांच्या मते, आर्थिक वर्ष २२ च्या पहिल्या सहामाहीत सिमेंटची मागणी वार्षिक २० टक्क्यांनी वाढली परंतु अवकाळी पाऊस, वाळू समस्या आणि मजुरांची अनुपलब्धता यामुळे दुसऱ्या सहामाहीत अनपेक्षित मंदी आली.
उच्च उत्पादन खर्च आणि महागाईचा ताण यामुळे नफ्याचे अंतर २७० ते ३२० बीपीएसने कमी होऊन ते १६.८ ते १७.३ टक्के होण्याचा अंदाज आहे. २०२२ अार्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये ३२३ दशलक्ष मेट्रिक टन सिमेंटचे उत्पादन झाले असून वार्षिक आधारावर ते २२ टक्के जास्त आहे. वादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे नाेव्हेंबर २०२१ मध्ये सिमेंटच्या मागणीवर परिणाम झाला होता परंतु त्यानंतर डिसेंबर २०२१मध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. उत्पादनात सुमारे १८ ते २० टक्के वाढ होऊन २०२२ आर्थिक वर्षात ते ३५५ दशलक्ष मेट्रिक टनांवर जाऊन काेविडपूर्व पातळी आेलांडेल.अलीकडच्या अर्थसंकल्पात कृषी, परवडणारी घरे आणि भांडवली खर्चासाठी ९.२ लाख कोटी रुपयांची तरतूद सिमेंट क्षेत्रासाठी चांगली असल्याचे इक्राच्या क्षेत्र प्रमुख अनुपमा रेड्डी यांनी सांगितले. चीन नंतर भारत हा दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश आहे. सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनुसार देशाची स्थापित सिमेंट उत्पादन क्षमता अंदाजे ५४५ दशलक्ष मेट्रिक टन आहे.
सिमेंटच्या मागणीत ७-८ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज : अहवाल
सिमेंटच्या मागणीत ७-८ टकक्यांनी वाढ होऊन ती चालू आर्थिक वर्षात ३८२ दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज आहे. ग्रामीण गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्राच्या भक्कम मागणी हे त्या मागचे कारण असल्याचे ‘इक्रा’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.