आयसीआयसीआय बँंकेची सूक्ष्म उद्योगांसाठी सुविधा; २५ लाखांचा पेपरलेस ओव्हरड्राफ्ट


मुंबई : आयसीआयसीआय बँकेने देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी (MSME) तसेच इतर बँकांच्या ग्राहकांसाठी भारतातील पहिली सर्वसमावेशक डिजिटल यंत्रणा सादर केली आहे. सद्य ग्राहकांसाठी सुधारित बँकिंग सेवा, इतर बँकांचे ग्राहक असलेल्या ‘एमएसएमई’साठी बँकिंग सेवांची श्रेणी आणि सर्वांसाठी मूल्यवर्धित सेवांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे.

कोणालाही आयसीआयसीआय बँकेच्या डिजिटल सेवांचा लाभ घेता येणार असून त्यासाठी केवळ इन्स्टाबिझ अप या व्यवसायासाठी सुपर अप असलेल्या अपची अद्यावत आवृत्ती गुगल प्ले स्टोअर किंवा अपल अप स्टोअरवरून अथवा बँकेच्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग (सीआयबी) प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करता येणार आहे. यावर आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘एमएसएमईज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत यावर आयसीआयसीआय बँकेने कायमच विश्वास ठेवला आहेय एमएसएमईजसाठी व्यवसाय करणे सुलभ व्हावे आणि आम्हाला त्यांच्या विकासात भागीदार होता यावे हे तत्व जपण्यास आम्ही प्राधान्य देतो.

एमएसएमईजना तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव आहे. व्यवसाय करण्याची पद्धत सोपी व्हावी यासाठी डिजिटल सेवांचा अवलंब करून पर्यायाने व्यवसाय वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते उत्सुक आहेत. एमएसएमईजसाठीच्या या सेवांमुळे कार्यक्षमता वाढेल.

इतर बँकांचे ग्राहक असलेल्या एमएसएमईजना इन्स्टाबिझच्या नव्या आवृत्तीवर ‘गेस्ट’ म्हणून लॉग इन करून विविध सेवांचा लाभ घेता येईल. या सेवांच्या यादीतील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणून २५ लाख रुपयांच्या तात्काळ आणि पेपरलेस ओव्हरड्राफ्ट सुविधेला मिळणारी मंजरी. ‘इन्स्टाओडी प्लस’ असे नाव असलेली या क्षेत्रातील ही पहिलीच सेवा असून त्याअंतर्गत कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना इन्स्टाबिझच्या अद्यावत आवृत्तीवर किंवा सीआयबीद्वारे केवळ काही क्लिक्सच्या मदतीने तत्काळ ओव्हरड्राफ्ट मिळवता येऊ शकतो. आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना त्यांचे ओडी करंट खात्यात तत्काळ सक्रिय करता येणार असून इतर बँकांच्या ग्राहकांना व्हिडिओ केवायसीच्या माध्यमातून बँकेत डिजिटल पद्धतीने करंट खाते सुरू करून या सेवेचा लाभ घेता येईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!