रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट मध्ये वाढ करण्याच्या निर्णयाने शेअर बाजारात पडझड


मुंबई, 4 मे : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मधील वाढीसंबंधी अचानक जाहिर केलेल्या एका निर्णयामुळे काही मिनिटात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तब्बल दोन वर्षांनी रेपो दरात (Repo Rate) वाढ केली आहे. RBI च्या या घोषणेनंतर शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची घसरणी पाहायला मिळाली.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी बुधवारी दुपारी अचानक पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात वाढ करणार असल्याची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. दिवसाखेर सेन्सेक्स जवळपास १३०० अंकांनी खाली आला. तर निफ्टी मध्ये ४०० अंकांची घसरण झाली/ वर आली आहे.

निफ्टी इंडेक्समधील 50 पैकी 44 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली, तर केवळ 6 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली.

काय आहे RBI चा निर्णय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवला असून तो 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांवर आणला आहे. याशिवाय RBI ने कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. CRR आता 4.50 टक्क्यांवर आला आहे. रेपो दरात वाढ झाल्याने कर्जाचा EMI वाढत असल्याने बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढेल आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल. त्यामुळे तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज हे सर्व आगामी काळात महाग होणार आहे.


One thought on “रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट मध्ये वाढ करण्याच्या निर्णयाने शेअर बाजारात पडझड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!