शेअर बाजार हे नाव जरी ऐकलं की आपण ह्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला एक गोष्ट नेहमी सांगीतली गेली आहे ती म्हणजे शेअर बाजार एक जुगार आहे. तुम्ही ह्या शेअर बाजारात कधीच पैसे कमवू शकत नाही. दुसरी गोष्ट खूप लोकांचा गैरसमज आहे की शेअर बाजारात काम करायचे असेल तर मला कॉमर्स किंवा खूप मोठ्या डिग्री ची गरज आहे पण मित्रांनो शेअर बाजार ट्रेडिंग आणि तुमच्या शिक्षणाचा तसा काहीही संबंध नाही आहे कोणीही शेअर ट्रेडिंग करू शकतो हो अगदी कोणीही शेअर ट्रेडिंग करू शकतो त्यासाठी लागतो तो पैसा, आत्मविश्वास, शेअर ट्रेडिंग बद्दल चे ज्ञान.
जर मी शेअर बाजारात आलो तर मी यशस्वी होईन का ? आणि नाही झालो तर ?? असे खूप प्रश्न लोकांच्या मनात असतात पण फक्त नुकसान होईल म्हणून आपण शेअर बाजारात काम करणार नसू तर आपण खूप मोठी संधी गमावतो आहेत असं मला वाटते. शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही प्रकारचे क्षेत्र असूदे सुरवातीच्या काळात तुम्हाला हवे तेवढे यश मिळणार नाही किंवा नुकसान देखील होईल पण एकदा का तुम्ही या क्षेत्रात काम करू लागलात तर त्याबाबत चे ज्ञान मिळायला सुरवात होते.
कोणत्याही क्षेत्रात आपण सुरवातीला चुका करतो आणि त्यामुळे आपले नुकसान होते पण एकदा अनुभव येऊ लागला की आपण त्या चुका परत करत नाही तसेच आपण शेअर बाजारात नवीन असताना ज्या चुका करतो त्या अनुभवानंतर आपण त्या करत नाही. शेअर बाजारात जर आपण काम चालू केले तर आपण आपला इतर व्यवसाय किंवा नोकरी देखील सांभाळून काम करू शकतो मला नक्की इथे सांगायला आवडेल सुरवात तर करून बघा यश अपयश हे पुढची गोष्ट आहे जर तुम्ही यशस्वी झालात तर नक्की तुम्हला एक उत्तम व्यवसाय भेटेल.
शेअर बाजारात आल्या नंतर फक्त खालील गोष्टी नेहमी विचारात घ्या
- शेअर बाजार म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नाही.आज खुपजण इकडे एक दिवसात श्रीमंत होण्यासाठी येत आहेत त्यामुळे खूप नुकसान होत आहे आणि होणारच शेअर बाजारात नेहमी संयम बाळगा
- शेअर बाजारात नेहमी जोखीम असते जमेल आणि झेपेल एवढीच जोखीम घ्या .सुवतीच्या काळात तर आपण शेअर बाजारात जपून काम केले पाहिजे इथे तुम्ही जितके दिवस टीकाल तितके तुमचे प्रॉफिट होण्याची संधी जास्त असते .
- शेअर बाजारात हमखास नफा किंवा दर महिना नफा असे काही नसते अश्या भूलथापांना बळी पडू नका. खूप जण आपल्याला कष्ट नको म्हणून आपली मेहनतीची कमाई कोणाच्याही हाती देत आहेत कारण ५/१०% फिक्स प्रॉफिट मिळेल ह्या अपेक्षेने कधीही कोणत्याही प्रकारच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवू नका.
- शेअर ट्रेडिंग हा व्यवसाय आहे इथे देखील मेहनत करावी लागते आणि त्याशिवाय नफा होणे खूप कठीण आहे.शेअर बाजारात नफा थोडा उशिरा मिळेल पण नक्की मिळेल.
त्यामुळे शेअर बाजारात काम करायला नक्की सुरवात करा यश अपयशाची चिंता करू नका फक्त प्रामाणिक प्रयत्न करा आज ना उद्या नक्की यश मिळेल.
—
नितीलेश पावसकर
८६०५१६८५२५
लेखक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट असून, गुंतवणूक सल्लागार आहेत.
तसेच त्यांचे ‘तनिषा शेअर मार्केट अकॅडमी’ नावाने शेअर मार्केट संबंधी ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत.
यासोबतच ET Now बिजनेस न्यूज चॅनेल वर तसेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर शेअर मार्केट तज्ञ म्हणूनही उपस्थित असतात.
====================
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील