नवीन व्यावसायिक या दोन कारणांमुळे नेहमी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असते


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसायात नव्यानेच उतरलेले आणि कोणताच व्यावसायिक अनुभव नसलेल्या व्यवसायिकांपैकी दोन प्रकारचे व्यावसायिक नेहमी आर्थिक दुष्टचक्रात अडकतात

पहिला वर्ग जो प्रमाणाबाहेर रेट तोडून डिस्काउंट देतो आणि दुसरा वर्ग जो माल खपतोय म्हणून कुणालाही उधारीवर माल देतो, आणि हे दोन्ही प्रकार एकत्र करणारा तर आयुष्यातूनच उठतो…
या दोन्ही गोष्टी केल्या जातात ते मार्केट्मधील जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी, किंवा स्पष्टपणे म्हटलं मार्केट तोडण्यासाठी.. मात्र अशा गोष्टींमुळे मार्केट तात्पुरते डिस्टर्ब होते, पण व्यवसाय मात्र कायमस्वरूपी डिस्टर्ब होऊन जातो

प्रमाणाबाहेर डिस्काउंट दिल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढतो, पण यामुळे हातात पैसा काहीच रहात नाही.
याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होतो.
विक्रीपश्चात सेवा देणे शक्य होत नाही ज्यामुळे ग्राहक कायमचा दुरावतो,
नफ्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे खेळते भांडवल वाढत नाही ज्यामुळे व्यवसायात वाढ करणे शक्य होत नाही,
पैसाच शिल्लक राहत नसल्यामुळे आणि काही महिन्यात ग्राहक कमी व्हायला लागल्यामुळे आर्थिक अडचण सुरु होते,
यात ग्राहकांना मोठ्या डिस्काउंटची सवय लावल्यामुळे पुढे रेट वाढवता येत नाही आणि मग नफा कमावण्यासाठी गुणवत्तेमध्ये तडजोड करावी लागते, ज्यामुळे ग्राहक आणखी दुरावतो, आणि या सगळ्याचा परिणाम शेवटी व्यवसाय डबघाईला येण्यात होतो.

उधारी वसुलीची खात्री नसताना उधारीवर माल देण्याने सुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत येतात.
उधारी वसुलीची खात्री असेल तरच उधारी करायची असते, नाहीतर व्यवसाय अडचणीत येण्यास वेळ लागत नाही. उधारी वेळेवर वसूल झाली नाही तर हातात पैसाच राहत नाही. नफा दूरच, मुद्दल सुद्धा मार्केटमध्ये अडकून पडते, आणि नवीन खरेदीसाठी पैसा शिल्लक राहत नाही, अशावेळी नवीन माल उपलब्ध न झाल्यामुळे ग्राहकांना हव्या असलेल्या गोष्टी देता येत नाहीत, खर्च भागवण्यासाठी पैसा शिल्लक रहात नाही, आणि व्यवसाय ठप्प व्हायला लागतो.
उधारीचे व्यवसाय तेव्हाच करायचा असतो जेव्हा वसुलीची खात्री असेल.

या दोन्ही परिस्थितीत व्यवसाय आर्थिक अडचणीत येतो, पण यापेक्षाही घातक आहे ते आर्थिक अडचण सोडवण्यासाठी सावकारी उचल… बहुतांशी नवीन व्यावसायिक आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी खाजगी सावकारांकडून पैसे उचलतात, पण यामुळे नुसता व्यवसायच नाही तर व्यवसायिक सुद्धा दिवाळखोरीत निघण्याची शक्यता निर्माण होते.

डिस्काउंट आणि उधारी या दुधारी तालवारीसारख्या आहेत. यांचा योग्य वापर झाला तर ठीक अन्यथा तिचा वर आपल्यावरच होतो आणि आपलाच बळी घेऊ शकतो.

व्यवसाय साक्षर व्हा…

_______________________

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!