बहुतेकांचा गैरसमज असतो कि आधी पैसा येतो आणि मग आपली value वाढते, पण हि प्रक्रिया पूर्णपणे उलटी आहे. आधी आपल्या कामाने आपल्याला आपली Value तयार करावी लागते आणि त्यानंतर पैसा यायला लागतो. आधी value creation आणि मग Money Generation
सचिन तेंडुलकर, धोनी, कोहली यांना जाहिरातीसाठी करोडो रुपये मिळतात म्हणून त्यांचे करोडो फॅन्स नाहीयेत. तर त्यांनी त्यांचे क्रिकेटमधील कौशल्य वापरून आपली Value तयार केली आहे, त्यांचे कौशल्य पाहून त्यांचे करोडो फॅन्स आहेत म्हणून त्यांना जाहिरातींसाठी करोडो रुपये मिळतात.
बच्चन, शाहरुख यांना एकेका शो साठी ५-१० कोटी सहज मिळतात म्हणून त्यांचे करोडो फॅन्स नाहीयेत, तर त्यांनी त्यांच्या कलेच्या प्रदर्शनातून करोडो फॅन्स तयार करून आपली Value निर्माण केलेली आहे म्हणून त्यांना एका दिवसाच्या शोसाठी सुद्धा करोडो रुपये मिळतात.
अंबानींनी, टाटांनी एखाद्या प्रोजेक्टची घोषणा केली तर त्या प्रोजेक्टमध्ये आपले पैसे लावण्यासाठी करोडो लोकांच्या रांगा लागतील… या रांगा त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून लागणार नाहीयेत तर त्यांनी आपल्या कामातून प्रोजेक्ट यशस्वी करण्याचं कौशल्य दाखवून दिलंय म्हणून करोडो गुंतवणूकदार त्यांच्या प्रोजेक्टमध्ये डोळे झाकून पैसे गुंतवण्याची हिम्मत करतील..
एखाद्या बिजनेस ची ज्यावेळी आपण फ्रँचाइजी घेण्याचा विचार करतो त्यावेळी त्या व्यवसायाने आपले कौशल्य सिद्ध केलेले आहे का हे पहिले जाते, त्यांनतर आपण ती फ्रँचाइजी घ्यायची कि नाही हे ठरवू शकतो. आधी त्या व्यवसायाला आपले यश दाखवावे लागेल मगच लोक त्यांच्या मागे जातील…
सामान्य घड्याळासारखंच घड्याळ असणाऱ्या Rolex ची किंमत लाखो रुपये असते, आणि लोकही त्यासाठी विना तक्रार पैसे देतात. याचे कारण ते महागडे प्रोडक्ट आहे म्हणून त्याची Value नाहीये, तर त्या ब्रँड ने आधी कित्येक वर्षांच्या कष्टातून आपली Value तयार केलेली आहे, म्हणून ग्राहकांना त्या ब्रँड साठी लाखो रुपये मोजतानाही त्यातून त्या ब्रँड ला असलेल्या Value च्या माध्यमातून योग्य परतावा मिळाल्याची जाणीव होत असते, ज्यामुळे ते विना तक्रार लाखो रुपये त्या घड्याळासाठी मोजायला तयार असतात..
Apple ब्रॅड तर याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणता येईल. या ब्रँड ने आपले जे Value Creation केलेलं आहे ते क्वचितच कुणाला तरी जमलंय. या Value Creation च्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने Money Generation केलंय त्यामुळे ती कंपनी आज जगातली सर्वात मोठी कंपनी बनली आहे, तब्बल ३ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे २४० लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटल असलेली कंपनी…
व्यवसाय साक्षर व्हा…
_______________________
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Sir thank you for you do this noble profession to educate small scale business man just like me.
Regards,
Sumedh
9322377830