माणूस कुठलीही कृती करतो, तेव्हा त्याला दोन कारणे असतात. एक म्हणजे ती कृती त्याला योग्य वाटते म्हणून तो करतो आणि दुसरं म्हणजे ती त्याला आवश्यक वाटते, म्हणून तो ती कृती करतो.
खरे तर तुमची दृष्टी जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत चालत रहा. त्या वळणापाशी गेल्यावर तुम्हाला कळेल की अजून बराच रस्ता आपल्याला पार करायचा आहे. आता तुम्हाला खूप दूरवरचे दिसू लागलेले आहे.
समस्या कोणतीही असो, तिच्याकडे साध्या सरळ नजरेने पहा. जीवनही असेच असते पण आपण ते अधिक व्यामिश्र करून टाकतो. त्यामुळे सगळ्याच समस्या या गुंतागुंतीच्या होऊन जातात. एकूणच जीवनाला साधेपणाने सामोरे जा.
सुज्ञ माणूस त्याला जिथे जायचे तिथपर्यंत आपला रस्ता आपणच तयार करतो. अनेकदा ती वेगळी वाटच त्याला पाऊल पाऊल ओढून नेते. खरे तर त्या अनोळखी वाटेवरून तो पर्यंत कोणीच गेलेले नसते. अगदी चुकार वाटसरू देखील.
जेव्हा तुमचे विचार शुद्ध व स्पष्ट असतील, तेव्हा ते विचार हीच तुमची कृती ठरते. योग्य विचारातून योग्य कृती आपल्याला करता आली पाहिजे.
आपल्यातील चैतन्यशक्तीतून उदयाला आलेल्या व्यवसायात आपण आपली संपत्ती गुंतवतो. या गुंतवणूकीत जर आपले चारित्र्य व आपला स्वतःवरचा विश्वास जर सहाय्यभूत ठरला तर आपण निश्चित यशस्वी होतो.
जो केवळ भविष्याचीच चिंता करतो तो वर्तमानात काहीच कृती करीत नाही. आपल्या इच्छांचे तोंड हे नेहमीच भविष्याकडे वळलेले असते. खरे तर वर्तमानातल्या ह्या क्षणातच संपूर्ण शक्ती दडलेली असते हे आपण विसरतो.
मी काय करू शकत नाही हे सांगायला मला कायदे तज्ञांची गरज नाहीये. मला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी आणि ते कायद्यात बसविण्यासाठीच मी त्यांना मानधन देतो.
अखेरीस तुमचे शील चारित्र्य, सधेपणा हाथ मापला जातो. खरे तर त्यावरच माणसाची उंची अवलंबून असते..
_
संकलन
उद्योजक मित्र
==========================