तुम्ही घेतलेला शेअर पडतो आणि विकलेला शेअर हमखास वाढतो असं नेहमीच होतं का?


शेअर मार्केटमध्ये मी कमनशीबी आहे असं नेहमीच वाटतं का ? जो मी शेअर घेतो आहे तो घेतल्या वरती नेहमी खाली येतो किंवा मी विकल्या नंतर तो लगेच वरती हा प्रश्न प्रत्येक ट्रेडर च्या मनात येतो ट्रेडिंग मध्ये आपण दर वेळेस आपल्याला कमनशीबी समजतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का ? आज आपण ह्याविषयी बोलूयात

शेअर बाजार म्हटलं की सर्व जो खेळ आहे तो तुमच्या मानसिकतेचा आणि तुमच्या अँनलिसिस आहे इथे आपण कसे काम करतो ह्या वरती तुमचे शेअर बाजारातील यश अवलंबून आहे. नवीन येणाऱ्या प्रत्येक ट्रेडर ला नेहमी वाटत असते की ट्रेड घेतल्या नंतर तो माझ्या विरुध्द दिशेने जातो आणि आपण आपली मानासिकता अशीच बनवतो आणि प्रत्येक ट्रेड मध्ये अश्याच प्रकारे विचार करायला सुरवात करतो अश्या प्रकरचा निगेटिव्ह विचार सारखा केल्यामुळे ट्रेड थोडा तरी आपल्या विरुद्ध गेला तर आपण लगेच निगेटिव्ह विचार करतो आणि जरा काही तो ट्रेड प्रॉफिट मध्ये आला की लगेच बाहेर पडतो बाहेर पडल्यावरती तो शेअर खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करताना दिसतो.

शेअर बाजारात तुमची मानसिकता खूप महत्वाची असते. तुम्ही जर प्रत्येक ट्रेड असा निगेटिव्ह विचार करून करत असाल तर तुम्ही खूप मोठे नुकसान करून घेत आहेत प्रत्येक ट्रेड ला नवीन सुरवात म्हणून बघा मी माझ्या प्रत्येक क्लायंट ला सांगत असतो, शेअर बाजारात काल काय झाले हे विसरून तुम्ही जेव्हा ट्रेडिंग कराल तेव्हाच तुम्ही यशस्वी ट्रेडसार बनू शकाल.

शेअर बाजारात काम करत असाल तर नशिबाच्या जोरावरती ट्रेड करू नका. टेक्निकल फंडामेंटल अनॅलिसिस शिका आणि त्याच बरोबर तुमच्या चुकांमधून शिका. शेअर मार्केटमध्ये फंडामेंटल अनॅलिसिस फार महत्वाचे असते. यासोबतच महत्वाचे म्हणजे शेअर च्या किमतीमध्ये लहान मोठे चढउतार नेहमीच होत असतात, हे चढउतार तात्पुरते आहेत कि ट्रेंड आहे हे समजणे आवश्यक असते, तरच ट्रेड यशस्वी होऊ शकतो.

नितीलेश पावसकर
८६०५१६८५२५ / 7666909157

लेखक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट असून, गुंतवणूक सल्लागार आहेत.
तसेच त्यांचे ‘तनिषा शेअर मार्केट अकॅडमी’ नावाने शेअर मार्केट संबंधी ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत.
यासोबतच ET Now बिजनेस न्यूज चॅनेल वर तसेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर शेअर मार्केट तज्ञ म्हणूनही उपस्थित असतात.

====================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 238 - Today Page Visits: 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!