‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ असा प्रकार शेअर मार्केटमध्ये चालत नाही


खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशीच काहीतरी आज शेअर ट्रेडर ची अवस्था आपल्याला दिसत आहे. आज शेअर बाजारात ज्या वेळेस एक ट्रेडर ट्रेडिंग साठी येत आहे तर त्याची जी अपेक्षा आहे ती खूप भरमसाठ प्रॉफिट ची आहे. १ लाख रुपये गुंतवणूक करून दिवसाला पाच-दहा हजार रुपये कमावणे ह्या नादात जे आपण हजार-बाराशे कमवत असतो त्याकडे दुर्लक्ष होते आणि कमवलेल्या प्रॉफिट चा रिस्पेक्ट न करता आपण जास्त हाव करतो आणि खूप मोठे नुकसान करून घेतोय ह्याचा विचार ट्रेडर ने करायला हवा.

शेअर ट्रेडिंग इतके पण सोपे नाही आहे की आपण तिथे दररोज ५-१०% प्रॉफिट कमावणे सहज साध्य वाटावे. शेअर बाजारात टिकून राहणे खूप महत्त्वाचे आहे छोटे छोटे प्रॉफिट करा आणि सोबतच प्रॉफिट कमवण्याबरोबर कॅपिटल वाचवण्यावरती देखील लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही कॅपिटल वाचण्यात यशस्वी झालात तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे हे लक्षात घ्या

आपल्याला शेअर बाजारात प्रॉफिट कमवायचे आहे. झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघून कधीच इथे प्रॉफिटेबल होता येत नाही. मृगजळाच्या मागे लागू नका कारण जर तुम्ही शेअर बाजारात चुकीची अपेक्षा ठेवली तर नुकसान हे होणारच आहे.

शेअर बाजारात पैसा बनतो पण संयम असेल तरच… ट्रेडिंग मध्ये सुद्धा संयम आवश्यक आहे

नितीलेश पावसकर
88055 58525 / 94056 45125

लेखक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट असून, गुंतवणूक सल्लागार आहेत.
तसेच त्यांचे ‘Tanisha Trading Academy’ नावाने शेअर मार्केट संबंधी ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत.
यासोबतच ET Now बिजनेस न्यूज चॅनेल वर तसेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर शेअर मार्केट तज्ञ म्हणूनही उपस्थित असतात.

====================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!