लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
ऑफलाईन बिजनेस, म्हणजे एखादे दुकान आहे, किंवा असे प्रोडक्ट आहे जिथे ग्राहकांशी समोरासमोर बोलण्याची गरज पडतेच असा व्यवसाय.
व्यवसाय ऑफलाईन असला तरी सध्याच्या ऑनलाईन जमान्यात ग्राहकांशी बरीच चर्चा मोबाइलबावरच होत असते, बऱ्याचदा फक्त मेसेज सुद्धा पुरेसे होऊन जातात. अशावेळी आपण ग्राहकाला जास्तीत जास्त माहिती ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करतो. कित्येकवेळा ग्राहकांना वेळोवेळी पडणाऱ्या विविध प्रश्नांची (FAQ) उत्तरे सुद्धा आपण आधीच तयार करून ठेवतो, त्याचाही एक चार्ट तयार करून ठेवलेला असतो, आणि ती प्रश्नोत्तरे ग्राहकांना आपल्या समोर येण्याआधीच समोर दिसतील आणि ते वाचून घेतील अशी व्यवस्था आपण करतो.. यामुळे ग्राहकाचे आपल्यासमोर येण्याआधीच सगळ्या शंकांचे निरसन होऊन जाईल असा आपला कयास असतो…
पण असं होत नाही… ग्राहकाला तुम्ही ऑनलाईन माध्यमातून कितीही माहिती दिली तरी त्याला समोर आल्यानंतरसुद्धा पुन्हा चर्चा करायचीच असते. आपण कितीही प्रश्नांची उत्तरे आधीच दिलेली असली तरी तो आणखी नवीन प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करतोच..आणि त्याची उत्तरे आपल्याकडे नसतील तर? किंवा ते प्रश्न नव्यानेच आपल्यासमोर आल्यामुळे आपण उत्तर देताना गोंधळून गेलो तर? तर डील हातून निघून जाते. ऑफलाईन बिजनेस मधे तुम्ही ऑनलाईन कितीही माहिती दिली तरी समोरासमोरच्या चर्चेमध्ये तुम्ही किती माहिती देता यानेच ग्राहकावर इम्प्रेशन पडत असते. अशा परिस्थितीत तुम्ही सगळ्या गोष्टी आधीच सांगून ठेवलेल्या असतील आणि अचानक नव्याने समोर आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तुम्हाला देता आली नाहीत तर ग्राहकाला वाटेल कि तुम्हाला काहीच येत नाही, तो व्यवहार लांबणीवर टाकेल…
ग्राहकाचा माईंडसेट नेहमी लक्षात घ्यायचा असतो. ग्राहकाला प्रत्येक टप्प्यावर थोडीतरी माहिती हवीच असते. आपण आपल्याकडची सगळी माहिती आधीच देऊन टाकली तरी त्याला ऑफलाईन सुद्धा चर्चा करायचीच असते. ऑनलाईन सगळी माहिती मिळाली म्हणून तो समोर आल्यानंतर एकही प्रश्न न विचाराता प्रोडक्ट खरेदी करेल असे नसते, तो समोर आल्यांनतर आणखी काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करणारच असतो..
त्यामुळे आपल्याकडे ग्राहक समोर आल्यांनतर त्याला सांगण्यासाठी काही शब्द शिल्लक असलेच पाहिजेत. ग्राहकाला ऑनलाईन माहिती पाठवताना प्रोडक्ट माहिती, प्रॉडक्टची वैशिष्ट्ये एवढीच माहिती सुरुवातीला द्यायची असते. यानंतर जर त्याने काही प्रश्न विचारले तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. आणि FAQ म्हणजे सामान्यपणे पडणारे प्रश्न समोरासमोरच्या चर्चेसाठीच राखीव ठेवावेत. हे FAQ एवढे असतात कि ते विचारतानाच एवढी मोठी चर्चा होते कि त्यात ग्राहकाचे समाधान होऊन जाते आणि ग्राहक बळजबरी काही नवीन प्रश्न निर्माण करण्याच्या भानगडीत पडत नाही. यामुळे लीड क्लोज होण्याचे प्रमाण आपोआपच वाढते.
मी मागे एका लेखात अशीच माहिती दिली होती कि ग्राहकाला एकाच वेळी सगळी माहिती कधीच देऊ नये. ग्राहकाला नवनवीन प्रश्न पडणार असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याकडे किमान चार ओळी उत्तराच्या स्वरूपात शिल्लक असल्या पाहिजेत. याच प्रकारे इथेही ऑफलाईन व्यवसायात ग्राहकाला ऑनलाईन माध्यमातून सगळी माहिती कधीच देऊ नये. समोर आल्यांनतर त्याला आपल्याशी खूप सारी चर्चा करायची असते अशावेळी आपल्याकडे त्या चर्चेसाठी आवश्यक असलेला शब्द संग्रह शिल्लक असला पाहिजे…
(फक्त ऑनलाईन माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवसायात ग्राहकाला माहित असते कि आपल्याला जी काही माहिती मिळणार आहे ती ऑनलाइनच मिळणार आहे त्यामुळे अशा व्यवसायात ग्राहकाला जास्तीत जास्त माहिती ऑनलाइनच मिळेल अशी व्यवस्था करावी…)
व्यवसाय साक्षर व्हा…
_______________________
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.