टायर बनवणाऱ्या MRF कंपनीचे शेअर्स इतिहास रचण्याच्या जवळ आहेत. कंपनीच्या एका शेअरची किंमत मागील तीन दिवसात ९० हजार रुपयांपासून ९८,६०० वाढली आहे. येत्या काही दिवसांत MRF चा शेअर १ लाखांवर पोहोचला, तर तो भारताचा पहिला लखपती शेअर ठरेल. मागील २० वर्षांत या शेअर ने १०० पटीने वाढ नोंदवली आहे.
शुक्रवारी ५ मे रोजी NSE वर बाजारात MRF चा शेअर वाढीसह ९८,६१४ रुपयांवर बंद झाला. याआधी फेवरूवरी २०२१ मध्ये शेअर ने ९८,५९९ रुपयांची पातळी गाठली होती. त्यांनतर दोन वर्षांनी हा शेअर आता आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. ही तेजी सोमवारीही कायम राहिली तर एमआरएफच्या एका शेअरची किंमत 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल यात शंका नाही.
२० वर्षात ११० पट वाढ
MRF च्या शेअर्सवर नजर टाकली असता, २००३ साली एका शेअरची किंमत ९०० च्या आसपास होती. आज तब्बल ९८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. शेअरची किंमत एवढी वाढण्याचे मुख्य कारण शेअर्सचे विभाजन न करणे हे आहे. MRF ने १९७५ पासून त्यांचे शेअर्स विभाजित केले नाहीत. यापूर्वी MRF ने १९७० मध्ये १:२ व १९७५ मध्ये ३:१० च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते.