मागील वर्षी १७ मे ला भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती. आजच्याच दिवशी LIC चा IPO शेअर बाजारात लिस्ट झाला होता. LIC चा IPO हा भरतील शेअर बाजारातील आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO होता. पण शेअरची लिस्टिंग निराशाजनक झाली. पहिल्याच दिवशी शेअर मध्ये ९% पर्यंत घसरण झाली. यानंतर आजतागायत हा शेअर सावरलेला नाही. लिस्टिंग च्या दिवशी शेअरचा असलेला भाव हा शेअरचा सर्वोत्तम भाव आहे आणि आज शेअर चा भाव ५७० रुपयांवर आहे जो जवळजवळ ४०% पेक्षा कमी आहे. IPO च्या वेळी कंपनीचे मार्केट कॅपिटल ६ लाख कोटी होते, जे आता ३.६ लाख कोटींवर आले आहे. अनेक गुंतवणूकदारांचेपैसे LIC मध्ये अडकून पडलेले आहे. हिंडेनबर्ग च्या अदानी ग्रुप विषयी आलेल्या रिपोर्ट नंतर तर हि पडझड आणखी वाढली
शेअर चे भाव पाडण्याचे कारण काय?
शेअर चे भाव पाडण्याचे अनेक करणे आहेत. त्यातील एक महत्वाचे कारण होते २०२२ मधील अस्थिरता. त्यात कोरोनामुळे इंश्युरन्स क्लेम वाढल्यामुळे कंपन्यांवर आर्थिक बोजा पडलेला होता. यामुळे इंश्युरन्स कंपन्यांची आर्थिक अवस्था खराब होण्याची गुंतवणूकदारांना भीती होती. यातच शेअर प्राईज थोडी जास्त असल्याचे तज्ञांचे मत होतेच याचाही परिणाम शेअर वर झाला. यातून कंपनी सावरेपर्यंत हिंडेनबर्ग चा रिपोर्ट आला आणि शेअर मध्ये पुन्हा मोठी पडझड झाली. कंपनीमध्ये अजूनही सरकारचा हिस्सा ९६% पेक्षा जास्त आहे, म्हणजेच मार्केटमध्ये अपेक्षित लिक्विडीटी नाही ज्यामुळे शेअरचे भाव वाढण्यावर मर्यादा येते. या सर्वच कारणांमुळे शेअर मध्ये अपेक्षेप्रमाणे वाढ होताना दिसत नाहीये आणि दिवसेंदिवस शेअर खालीच जात आहे.
आता पुढे काय? शेअर मध्ये वाढ होणार आहे कि नाही ?
खरे तर कंपनीचे फंडामेंटल पहिल्यापासूनच चांगले आहेत, कंपनीला काहीही धोका नाही, पण शेअर प्राईज थोडी जास्तच आहे असे तेव्हाच अनेक तज्ञांचे मत होते. फंडामेंटली अभ्यास केला तर लक्षात येईल कि कंपनीची आर्थिक स्थिती मागील वर्षापेक्षा यावर्षी जास्त चांगली राहणार आहे. तज्ञांच्या आणि आर्थिक अभ्यासकांच्या मते यावर्षी कंपनीची उलाढाल, नफा, निव्वळ नफा, EPS सर्व काही चांगलेच राहणार आहे. आणि यामुळेच जवळजवळ सर्वच तज्ञांकडून शेअर होल्ड करण्याचाच सल्ला दिला जात आहे. दीर्घ कालावधीसाठी शेअर मध्ये काहीही समस्या नसल्याचे तज्ञांचे मत आहे. मार्केटची सध्याची परिस्थिती पाहता नव्याने खरेदी करण्याचा सल्ला कुणी दिलेला नसला तरी होल्ड करण्याचा सल्ला तज्ञांनी दिलेला आहे.
आज शेअरची अवस्था वाईट झालेली असली तरी दीर्घ कालावधीमध्ये शेअर मध्ये चांगली वाढ होण्याचे संकेत आहेत. अनेक तज्ञांच्या मते पुढील काही वर्षात शेअर पुन्हा आपली सर्वोच्च पातळी गाठू शकतो. परंतु यासाठी काही वर्षे वाट बघावी लागू शकते. शेअर ला ४५०-५०० च्या आसपास खरेदीसाठी संधी मिळू शकते. पण हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. पण काही झाले तरी कंपनीमध्ये दुर्घकालीन गुंतवणुकीला काहीही धोका नाही हे निश्चित आहे. मागच्या वर्षभरात मात्र कंपनीने गुंतवणूकदारांना तोट्यातच ढकलले आहे हे खरेच.
(हा लेख गुंतवणूकदारांच्या फक्त माहितीकरिता आहे. यामाध्यमातून कुठेही शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला दिलेला नाही. गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करून आपल्या जबाबदारीवरच करावी.)
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.