आझिम प्रेमजी यांचे अमूल्य विचार


 • विप्रो लिमिटेडचे ​माजी ​अध्यक्ष
 • बोर्डाचे गैर-कार्यकारी सदस्य आणि संस्थापक अध्यक्ष आहेत.
 • एशियावीक द्वारे जगातील २० सर्वात शक्तिशाली पुरुषांमध्ये निवड.
 • टाइम नियतकालिकामधे १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दोनदा निवड (२००४ आणि२०११)
 • अनेक वर्षांपासून, ते नियमितपणे ५०० सर्वात प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत आहे.
 • अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरूचे कुलपती
 • सामाजिक कार्यासाठी देणगी देण्यात आघाडीवर
 • २०१९ मधे रु. ५० हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान केली

 • २००५ साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
 • २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार
 • मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एडुकेशन कडून २००० साली मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित
 • २००६ साली नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीयरिंग, मुंबई यांच्याकडून लक्ष्य बिझनेस व्हिजनरी या पुरस्काराने सन्मानित
 • बिझनेस वीक मॅगझीन ने विप्रो कंपनी ही जगातील सर्वात वेगवान प्रगती करणारी कंपनी व अझीम प्रेमजी यांची महान उद्योगपती म्हणून दाखल घेतली.
 • २००९ साली मिडलटाऊन येथील वेसलेयन विद्यापीठ ने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन मानद विद्यावाचस्पती पदवीने सन्मानित केले.
 • २०१५ साली म्हैसूर विज्ञापीठाने मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले.
 • एप्रिल २०१७ साली इंडिया टुडे मॅगझिनने २०१७ सालच्या यादीमध्ये भारतातील ५० प्रभावशाली लोकांमध्ये अझीम प्रेमजी यांना ९ वा क्रमांक दिला.

अझीम प्रेमजी यांचे अमूल्य विचार

जसजसे तुम्ही उच्चपदस्थाकडे सरकू लागता, तसतसे तुम्ही आपल्या अधिकाराची सूत्रे सहकाऱ्यांमध्ये विभागून दिली पाहिजेत. कंपनीच्या कामकाजात अधिकारीवर्गाला सामावून घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

माझी सुरुवातीची काही वर्षे हि अधिकतर शिकण्याचीच होती. कारण आपल्या वडिलांचा व्यवसाय सर्वार्थाने सांभाळणे व पुढे नेत राहणे, हे माझे प्रथम कर्तव्य होते आणि ते मला करायचे होते.

एक सल्लागार या नात्याने मला काय हवे आहे, ते मी निःसंदिग्धतेत मांडू शकतो. अर्थात या बाबत कुणाचाही मुलाहिजा ठेवायची आवश्यकता मला कधी वाटली नाही.

‘विप्रो’ ला जगातल्या पहिल्या दहा आयटी कंपनीत सतत ठेवणे, ही माझी मनोकामनाच नव्हे तर महत्त्वाकांक्षा आहे.

चारित्र्य ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या सगळ्या कृती व निर्णय निश्चित करीत असते. अत्यंत प्रांजलतेने आम्ही स्वच्छ मोकळेपणाने गुंतवणूक केली, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही ठाम भूमिका घेणे, आम्हाला शक्य झाले.

शिक्षण हा आत्मविकसनाचा एकमेव मार्ग आहे यात शंका नाही.

आमच्या कार्यपद्धतीत आम्ही नम्रता आणि प्रामाणिकता यावर विशेष भर देतो. मानवी मूल्यांचा पूर्ण आदर करून आम्ही

आमच्या ग्राहकांना नेहमीच योग्य प्रतिसाद देत आलो आहोत.

मला नेहमीच असे वाटते की मी जसे भरभरुन आणि मनापासून काम करतो, तसे इतरांनीही करावे.

बहुतेक वेळेला लोक वा संघटना-संस्था या भविष्यकाळासाठीच जगत असतात.

_

संकलन
उद्योजक मित्र

==========================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!