कार्लोस स्लिम खेळू हे मेक्सिकन उद्योजक व गुंतवणूकदार असून जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. स्लिम यांच्या उद्योगसमूहाने संपूर्ण मेक्सिकन अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य उद्योग व्यापलेले आहेत, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, औद्योगिक उत्पादन, वाहतूक, रिअल इस्टेट, मास मीडिया, ऊर्जा, आदरातिथ्य, मनोरंजन, उच्च-तंत्रज्ञान, रिटेल, क्रीडा आणि आर्थिक सेवा यांचा समावेश आहे. मेक्सिकन स्टॉक एक्स्चेंज मधील 40% सूचीमध्ये त्यांचा वाटा आहे, तर त्यांची निव्वळ संपत्ती मेक्सिकोच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे 6% च्या समतुल्य आहे. 2016 पर्यंत, ते न्यूयॉर्क टाइम्स कंपनीचे सर्वात मोठे एकल भागधारक होते.
कार्लोस स्लिम हेलू यांचे अमूल्य विचार
इतरांच्या आभिप्रायावर आपले मोठपण अवलंबून नसते. माझ्या नंतर माझे अस्तित्व या नावाने कोरले जावे.. असले विचार मी कधीच करीत नाही.
या अत्याधुनिक तंत्रकुशल प्रवाही गतीत प्रत्येक गोष्ट स्वतः तुम करणे हे शक्य नसते आणि इष्टही नसते. इतर अनेकांबरोबर सहप्रवास सहयोग हा करावाच लागतो.
काही रिटेल ग्रूप्स ई कॉमर्स’चे तंत्र वापरत आहेत. पारंपरिक पद्धतीने उद्योग करण्याची व्यवस्थाप्रणाली, आधुनिकतेच्या गतीत कालबाह्य होईल, असे समजणे चूक आहे. खरं तर परंपरेच्या या लाटेतूनच नव्या प्रवाहाचा उगम होत असतो.
तुम्ही जसजसे विकसित होत समृद्ध होत जाता, तसतशी इतरांना मदत करण्याची तुमची जबाबदारी वाढत जाते.
आपला उद्योग प्रभावी व परिणामकारकतेने चालवणे हे जितके आवश्यक आहे, तितक्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीने, इतरांना सर्वतोपरी सहाय्यभूत ठरत सामाजिक उन्नती साधणे, हेही तितकेच गरजेचे आहे.
टेलिकम्युनिकेशन संवाद संपर्कव्यस्था हा तर नव्या संस्कृतीचा मूलगाभा आहे. आपणही तिथे असणे गरजेचे आहे.
जेव्हा जेव्हा आम्ही काही करण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय प्रत्यक्ष अंमलातही आणतो..
कंपनीतली आणिबाणीची स्थितीगती ही एक सत्वपरीक्षाच असते. कारण काही लोक अशा प्रतिकूलतेत काढता पाय घेतात. पण अशावेळी आम्ही मात्र त्या कंपनीत प्रवेश करायला मदत करायला सर्वार्थाने उत्सुक असतो.
प्रश्न प्रशासनव्यवस्थेची नव्याने पुनर्रचना करण्याचा नसून, त्याच्याशी निगडित बार्बीची घट्ट पुनबांधणी करण्याचा आहे. प्रथम व्यवस्थापनातील जटिल स्तर कमी करावे लागतील. अवाढव्यतेने पसरलेल्या कार्पोरेट जाळ्यांपेक्षा मोजक्या उपलब्धतेत अधिकाधिक कार्यक्षम असणे नितांत गरजेचे नाही का ?
समस्यांची उकल नेमकेपणाने व त्वरित करीत सक्षमतेकडे जाणे अगत्याचे असते. केवळ संताक्लॉजसारखे देणग्या देणे आम्हांला पसंत नाही. कारण केवळ आर्थिक सहाय्य केल्याने गरीबी काही हटत नसते. आमचा असा दृढ विश्वास आहे ज्या व्यावसायिकाला आपला स्वतःचा उद्योग कार्यक्षमतेने करता येतो त्याला ‘फांउडेशन ची संपूर्ण जबाबदारी पेलणे सहज शक्य आहे. केवळ देणगी देणे, समस्या सोडविणे या पुरते प्रश्न मर्यादित नसतात तर पायाभूत खर्च पेलण्याची ताकद आपण वाढविली पाहिजे. यातही उपलब्ध स्रोतांचा उचित वापर आपल्याला करता आला पाहिजे.
_
संकलन
उद्योजक मित्र
==========================