About Us

“उद्योजक मित्र” हे व्यवसायासंबंधी विविध माहिती पुरविणारे व नवउद्योजकानं मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य माध्यम आहे. याद्वारे विविध सोशल मीडिया, वेबसाईट्स च्या माध्यमातून उद्योजकांना व्यवसायाविषयी मार्गदर्शनपर माहिती पुरविली जाते.

उद्योजक मित्र ची स्थापना श्रीकांत आव्हाड यांनी २०१६ साली केली. मराठी तरुणांना उद्योजकतेच्या मार्गात एक मार्गदर्शक म्हणूनहे माध्यम सुरु झालेले आहेत. नवउद्योजकांना व्यवसाय सुरु करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, व्यवसाय सुरळीतपणे चालण्यासाठी मार्गदर्शन करता यावे या उद्देशानं हे व्यासपीठ निर्माण झाले आहे. आज उद्योजक मित्र च्या सर्व नेटवर्क ला मिळून ५ लाख पेक्षा जास्त व्यावसायिक जोडले गेलेले आहेत.

“उद्योजक मित्र” चा महत्वाचा उद्देश म्हणजे नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना व्यवसायासंदर्भात शक्य तेवढी माहिती उपलब्ध करून देणे, नवउद्योजकांना व्यवसाय साक्षर बनविणे. कित्येक नवउद्योजकांना व्यवसायाची प्राथमिक माहिती सुद्धा नसते, अगदी व्यवसाय नोंदणी कोणती करावी इथपासून आपल्या समस्या सुरु होतात. जिथं आपल्याला प्राथमिक माहिती नाही तिथं व्यवसाय तर खूप लांबची गोष्ट आहे. यामुळेच मराठी तरुणांमधे उद्योगाविषयी स्वारस्य निर्मण होत नाही. तसेच सुरु झालेले अनेक व्यवसाय अपयशी होण्याचेही प्रमाण जास्त आहे. याच विचाराने मराठी उद्योजकांना व्यवसाय साक्षर बनवण्यासाठी ‘उद्योजक मित्र’ ची स्थापना झाली आहे.

म्हणूनच या वेबसाईटवर वर व्यवसायासंबंधी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. यात व्यवसायासंबंधी विविध लेख, व्यवसायासंबंधी माहिती, शासकीय योजना, व्यवसायांची नवनवीन संकल्पना, व्यवसाय संधींची माहिती, व्यवसाय विषयक बातम्या यासारखे विविध विषय आहेत.

Our Business Group

error: Content is protected !!