कॉपीराईट 

कॉपीराईट हा एक कायदेशीर हक्क आहे, जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्यांच्या सृजनशील साहित्यिक, कलात्मक किंवा संगीतकृतीवर एकाधिकार (Exclusive Rights) प्रदान करतो. हे हक्क सर्जकाला त्याच्या कामाचे पुनरुत्पादन, वितरण, सार्वजनिक प्रदर्शन आणि रूपांतरण करण्याचा अधिकार देतात.

कॉपीराईट हे सर्जनशीलता आणि बौद्धिक संपत्तीचे महत्त्वपूर्ण संरक्षण आहे. आपल्या कलाकृतीला कॉपीराईट करून कायदेशीर संरक्षण मिळवा आणि आपल्या सृजनशीलतेचा योग्य सन्मान मिळवा

उद्योजक मित्र ची अनुभवी वकिलांची टीम तुम्हाला कॉपीराईट संबंधी सर्व सेवा पुरवते.

  • कॉपीराईट नोंदणी
  • कॉपीराईट मार्गदर्शन
  • कायदेशीर प्रक्रिया

अधिक माहितीसाठी जवळच्या
‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा

किंवा खालील लिंक वर क्लिक करून
WhatsApp मेसेज करा

IPR क्षेत्रातील तज्ञ वकील

सुयोग्य मार्गदर्शन

250+ समाधानी क्लायंट्स*

कॉपीराईटचे उद्दिष्ट

  • सर्जनशीलता प्रोत्साहित करणे : कलाकार, लेखक, संगीतकार इत्यादींना त्यांच्या कामातून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • सृजनशील कामांचे संरक्षण : नक्कल, चोरून वापरणे किंवा अनधिकृत पुनरुत्पादनापासून संरक्षण करणे.
  • मालकाचे अधिकार : सर्जकाला त्याच्या कलाकृतीचा एकाधिकार प्रदान करणे.

 

कॉपीराईट अंतर्गत संरक्षित कामे

कॉपीराईट फक्त मूळ आणि सर्जनशील कामांना लागू होते, ज्यामध्ये खालील प्रकार येतात:

  • साहित्यिक कृती (कथा, कादंबऱ्या, लेख, कविता)
  • संगीत आणि गाणी (संगीत ध्वनी, गीत)
  • नाट्यकृती (नाटक, स्क्रिप्ट)
  • चित्रपट, व्हिडिओ आणि ऑडिओ व्हिज्युअल कृती
  • कलाकृती (चित्र, छायाचित्रे, शिल्पकला)
  • संगणक सॉफ्टवेअर आणि गेम्स
  • आर्किटेक्चरल डिझाइन
  • डेटाबेस आणि मूलभूत डिझाइन

 

कॉपीराईट संरक्षणाच्या बाहेरचे काम

  • कल्पना, संकल्पना, पद्धती किंवा प्रणाली
  • सामान्य माहिती, बातम्या
  • शासकीय दस्तऐवज आणि कायदेशीर निर्णय
  • गणितीय सूत्रे आणि व्याख्या
  • नाव, टायटल, लघुनावे

 

कॉपीराईटचे हक्क (Copyright Owner’s Rights)

  • पुनरुत्पादनाचा हक्क (Right to Reproduce) : मूळ कलाकृतीची प्रत तयार करण्याचा हक्क.
  • वितरणाचा हक्क (Right to Distribute) : प्रत वितरण किंवा विक्रीचा हक्क.
  • सार्वजनिक प्रदर्शनाचा हक्क (Right to Public Performance) : नाटक, संगीत इत्यादींचा सार्वजनिक प्रदर्शनाचा हक्क.
  • रूपांतराचा हक्क (Right to Adapt) : मूळ कलाकृतीचे अनुवाद, रूपांतर किंवा पुनर्रचना करण्याचा हक्क.
  • संचयनाचा हक्क (Right to Store) : डिजिटल स्वरूपात संचय करण्याचा हक्क.

 

कॉपीराईटची कालावधी (Copyright Duration in India)

  • सर्जकाच्या आयुष्यभर + 60 वर्षे: साहित्य, नाटक, संगीत, कलाकृतींसाठी.
  • प्रकाशनाच्या 60 वर्षे: सिनेमा, ध्वनिमुद्रण, छायाचित्रांसाठी.

 

कॉपीराईटचे फायदे

  • सर्जकाला आर्थिक फायदा मिळतो.
  • सृजनशीलतेला प्रोत्साहन मिळते.
  • अनधिकृत वापरापासून संरक्षण मिळते.
  • कलाकृतीचे वितरण, विक्री आणि प्रदर्शनावर नियंत्रण मिळते.

 

कॉपीराईट नोंदणीची प्रक्रिया

  • अर्ज सादर करणे : कॉपीराईट ऑफिसमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करणे.
  • नोंदणी शुल्क भरणे : विविध प्रकारच्या कामांवर अवलंबून शुल्क भरणे.
  • जाहिरात व विरोध कालावधी (Examination & Objection Period) : अर्जावर आक्षेप आल्यास त्याची सोडवणूक करणे.
  • प्रमाणपत्र जारी करणे (Issuance of Certificate) : सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॉपीराईट प्रमाणपत्र मिळते.

तुमच्या जवळील “उद्योजक मित्र” शाखा शोधा

error: Content is protected !!