About Founder

श्रीकांत आव्हाड (Shrikant Avhad)

संस्थापक – उद्योजक मित्र 

श्रीकांत आव्हाड हे मूळचे अहमदनगर येथील असून ते स्वतः वकील आहेत तसेच वकिली कुटुंबातून आलेले आहेत. श्रीकांत आव्हाड यांचे शिक्षण अहमदनगर व पुणे येथे झाले असून त्यांनी काही काळ औरंगाबाद उच्च न्यायालय येथे वकिली केलेली आहे. परंतु व्यवसायाची आवड असल्या कारणाने २०१० साली वकिलीसोडून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले. व्यवसायाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांचा पहिला व्यवसाय कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय यशस्वी ठरला. पहिल्या तीन वर्षातच त्यांनी आणखी दोन व्यवसाय सुरु केले. यासोबतच अनेक नवनव्या संकल्पनांवर ते काम करत होते. आपल्या नवनवीन व्यवसाय संकल्पनांवर काम कात होते.

याच काळात त्यांनी २०१५ साली आपला व्यवसाय मार्गदर्शन क्षेत्रात व्यवसाय सुरु केला. Roslin Business Solutions (रॉजलीन) या नावाने त्यांनी आपला व्यवसाय मार्गदर्शन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला नवीन बिजनेस ऑफर्स जोडून देणे, व्यवसाय स्थापनेसाठी सहकार्य करणे अशा कामांशी व्यवसाय निगडित होता, परंतु हळूहळू मराठी मुलांमधे व्यवसायाविषयी असलेले अज्ञान त्यांना व्यवसायात पुढे येण्यात अडथळा ठरत आहे हे त्यांच्या लक्षात आले, व त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी तरुणांमध्ये व्यवसायाविषयी जनजागृती करायला सुरुवात केली. यातूनच पुढे “उद्योजक मित्र” चा जन्म झाला.

आपल्या कन्सल्टिंग व्यवसायासोबतच मराठी तरुणांना व्यवसायाविषयी मार्गदर्शन करणारे एक माध्यम आवश्यक असल्याची त्यांना जाणीव झाली, व त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर काम सुरु केले. मराठी तरुणांना आपलेसे वाटेल असे नाव आवश्यक होते. यातूनच ‘उद्योजक मित्र’ हे नाव सुचले आणि तेच पुढे वापरले गेले. सुरुवातीला फेसबुक पेज सुरु केले. दररोज व्यवायीविषयी विविध माहिती पब्लिश करणे सुरु झाले. विविध लेख, टिप्स, यशस्वी उद्योजकांचे विचार अशी विविध माहिती पब्लिश करायला सुरुवात केली. कालांतराने वेबसाईट सुरु केली. त्यावर दररोज विविध लेख पब्लिश करणे सुरु झाले. आता सोशल मीडियावर उद्योजक मित्र चे एकूण पाच लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तसेच वेबसाईटला दररोज हजारो व्यावसायिक वाचक भेट देतात.

उद्योजक मित्र ला मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच फक्त ऑनलाईन न राहता उद्योजकांसाठी ग्राउंड लेव्हलवर व्यवसाय मार्गदर्शकांची असलेली आवश्यकता पाहता आता ‘उद्योजक मित्र’ ला सोशल सोबत कमर्शिअल असे स्वरूप देऊन ‘उद्योजक मित्र’ चा महाराष्ट्र अनेक शहरांमधे शाखांच्या द्वारे विस्तार सुद्धा सुरु झाला आहे. यातून महाराष्ट्रातील लाखो उद्योजकांना फायदा होईल असा विश्वास आहे.

श्रीकांत सरांचे ‘उद्योजक मित्र’ व्यतिरिक इतर व्यवसाय आहेत. ते याव्यतिरिक इतर व्यवसायात सुद्धा सक्रिय आहेत. तसेच आजही अनेक नवनवीन संकल्पनांवर काम करत असतात. काही नवीन संकल्पना असलेल्या वेबसाईट्स त्यांनी लाँच केलेल्या आहेत व त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. श्रीकांत सरांचे इतर व्यवसाय त्यांचे वैयक्तिक प्रोफाइल ShrikantAvhad.com या वेबसाईटवर पाहता येईल.

Shrikant Avhad – Founder of Udyojak Mitra 
Shrikant Avhad History 
Shrikant Avhad Udyojak Mitra Journey 

error: Content is protected !!