उद्योजक मित्र चे सन्माननीय सहकारी होण्याची संधी.
प्रत्येक शहरात “उद्योजक मित्र” च्या शाखा सुरु करावयाच्या आहेत.

राज्यभरातील प्रत्येक शहरात “उद्योजक मित्र” च्या शाखा सुरु करावयाच्या आहेत.

मागील पाच वर्षांपासून ‘उद्योजक मित्र’ व्यवसाय मार्गदर्शन क्षेत्रात एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. आजपर्यंत ‘उद्योजक मित्र’ च्या माध्यमातून हजारो व्यावसायिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुयोग्य मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे. परंतु ‘उद्योजक मित्र’ चे काम प्रामुख्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच चालत असल्याने अनेक व्यावसायिक उद्योजक मित्र च्या संपर्कात येण्यास इच्छुक असूनही त्यांना शक्य होत नाही. ‘उद्योजक मित्र’ च्या शाखांच्या माध्यमातून आता आपण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आपले नेटवर्क तयार करत आहोत.

राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका शहरात तसेच इतरही मोठ्या शहरात या शाखा सुरु केल्या जात आहेत. या शाखा म्हणजे स्थानिक परिसरासाठी एक बिजनेस सेंटर्स असतील अशा प्रकारे डेव्हलप केल्या जातील.

या शाखेच्या माध्यमातून खालील कामे चालतील

१. व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासंबंधी प्राथमिक स्तरावरील माहिती पुरविणे. उदा. व्यवसाय कसा निवडावा, गुंतवणूक क्षमतेनुसार नियोजन कसे करावे, नोंदणी कशी करावी, लायसन्स कोणकोणते लागतील, कागदपत्रे काय काय लागतात, व्यवाय उभारणीचे टप्पे कसे असतील इ. याला आपण प्राथमिक स्तरावरील मार्गदर्शन म्हणू शकतो. यासाठी शाखा चालकाला किंवा एका व्यक्तीला त्याहिशोबाने तयार केले जाईल.
२. या मार्गदर्शनाव्यतिरिक्त नवीन व्यावसायिकांना सेल्स, मार्केटिंग, जाहिरात, कस्टमर हॅण्डलिंग, बिजनेस मॅनेजमेंट अशांसाठीही मार्गदर्शनाची गरज असते, हे मार्गदर्शन उद्योजक मित्र च्या माध्यमातून करण्यात येईल.
३. व्यवसाय उभारणी साठी मार्गदर्शन करणे. यासाठी उद्योजक मित्र चे संस्थापक श्रीकांत आव्हाड हे स्वतः सुद्धा उपलब्ध असतील. सुरुवात कशी करावी, सेटअप कसा उभारावा, ब्रॅण्डिंग कसे करावे, मार्केटिंग सेल्स साठी टिप्स, बिजनेस वाढवण्यासाठी मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन असेल.
४. कमी गुंतवणुकीत सुरु करता येईल अशा भरपूर व्यवसायांच्या संधी आहेत. परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी या संधींचा शोध घेता येत नाही आणि सुरुवात करता येत नाही. अशा व्यवसाय इच्छुकांना सुद्धा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.
५. व्यावसायिकांच्या मिटिंग आयोजित करणे. कार्यशाळा घेणे. व्यावसायिकांचे व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून सहकार्य करणे.
६. व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करणाऱ्या सेवा पुरविणे. उदा. रजिस्ट्रेशन, टॅक्सेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, लायसन्सिंग, वेबसाईट डिझाईन, लोगो डिझाईन, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन इ. कामे करणे. तसेच सबसिडीसंबंधी सुद्धा सेवा विचारात आहे, त्यावरही लवकरच काम सुरु होईल.
७. व्यवसायविषयक पुस्तकांची, मासिकांची विक्री व वाचनालय
८. व्यवसायविषयक कोर्सेस. व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कौशल्यांचे कोर्सेस पुरवणे.
९. वेगवगेळ्या व्यवसाय संधींची माहिती करून देणे, व्यवसाय ऑफर्सची माहिती देणे. तसेच आपल्या माध्यमातून काही व्यवसाय संधी दिल्या जातील त्यासंबंधी इच्छुकांना जॉईन करून घेणे.
१०. व्यावसायिकांसाठी जाहिरातींची कामे करणे. वेगवेगळ्या माध्यमांतून जाहिरातीचा सपोर्ट देणे.
११. मशिनरी सप्लायर्स, कच्चा माल सप्लायर्स यांची माहिती देणे. तसेच शक्य झाल्यास मशिनरी विक्रेत्यांशी टायअप करून शाखांच्या माध्यमातून मशिनरींची विक्री सुद्धा सुरु केली जाईल.
१२. व्यावसायिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी उद्योजकमित्र चे संस्थापक श्रीकांत आव्हाड स्वतः ठराविक काळाने प्रत्येक जिल्ह्यात एक-दोन दिवस हजर असतील. यात व्यवसाय विषयक मार्गदर्शनपर लेक्चर, व्यावसायिकांच्या प्रश्नांची उत्तरे, प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन अशा गोष्टी समाविष्ट असतील.
१३. व्यवसाय सुरु करण्यासंबंधी काही कोर्सेस (StartUp Course) सुरु करण्याचे विचारात आहे, ते या शाखांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर केले जाईल. यासाठी श्रीकांत आव्हाड स्वतः लेक्चरसाठी उपस्थित असेल.
१४. व्यवसायांचे प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय, अशासकीय संस्थांशी टायअप करून जिल्हा स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे विचारात आहे.
१५. फायनान्स कंपन्या, बँक यांचेशी टायअप करून उद्योजकांना कर्जप्रकरणी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासंबंधी नियोजन चालू आहे.
१६. या सर्व्हिसेस आत्ता चालू आहेतच, काही लवकरच सुरु केल्या जातील, परंतु याव्यतिरिक्त आणखीही बऱ्याच गोष्टी येत्या काळात सुरु करण्याचे विचारात आहे, ज्यात ईकॉमर्स पोर्टल, Mobile App, मेम्बरशिप प्रोग्रॅम्स, सेल्स लीड्स सर्व्हिस, बिजनेस एक्स्पो, लोकल शॉपिंग सेंटर अशा बऱ्याच गोष्टी प्लॅनिंगमधे आहेत.
१७. शाखा स्थापन केली म्हणून सगळं काही तुम्हालाच करावे लागेल असे नाही. व्यावसायिकांना मार्गदर्शनासाठी श्रीकांत सर स्वतः वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असतील. मार्गदर्शन कार्यक्रम, लेक्चर्स वेळोवेळी आयोजित केले जातील. तुमचा व्यवसाय वाढावा व स्थानिक स्तरावर जास्तीत जास्त व्यवसायिकांपर्यंत पोचता यावे यासाठी आम्ही नेहमीच सक्रिय सहभागी असू.

एका अर्थाने या उद्योजक मित्र शाखा म्हणजे शहरातील बिजनेस सेंटर्स असतील जिथे व्यावसायिकांना सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाईल.

राज्यातील तालुका व जिल्ह्याच्या प्रत्येक शहरात, तसेच इतरही शहरात या शाखा सेटअप करायच्या आहेत. जास्तीत जास्त ३ लाख लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे शाखा सेटअप केल्या जातील.

यात शाखाधारकांना उत्पन्न चांगले मिळेलच, अगदी भरपूर मिळेल याची आम्ही खात्री देतो, पण यासोबतच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्यामुळे समाजात मानसन्मानही मिळेल.

यासाठी इच्छुक असलेले व्यक्ती व्यवसायात अनुभवीच असेल पाहिजे असे नाही. अनुभव असल्यास फायदाच होईल, आपला अनुभव सांगणे आणि वाचलेली माहित सांगणे यात फरक पडतोच, पण अनुभव नसेल तरी तुम्हाला त्यादृष्टीने वर्षभरात तयार केले जाईल.  
इच्छुक व्यक्ती व्यवसायात अनुभवी असेल तर शिक्षणाचा संबंध नाही, पण अननुभवी असेल तर शिक्षण किमान ग्रॅज्युएट पास असावे.

गुंतवणूक 

यासाठी गुंतवणूक किमान रु. २,५०,०००/- आवश्यक आहे

या गुंतवणुकीचे सविस्तर वर्गीकरण असे असेल. 

१. शाखा जॉइनिंग एकरकमी शुल्क – रु. १५,०००/-

२. पुस्तकांच्या खरेदीसाठी व पुस्तकांच्या बदल्यात सेक्युरिटी डिपॉजिट अशी एकत्रित गुंतवणूक रु. ३५,०००/-. यामधे रु. २०,०००/- किमतीची पुस्तके खरेदी करणे व ऑनलाईन वेबसाईटसाठी स्टॉकिस्ट म्हणून रु. १५,०००/- सिक्युरिटी डिपॉजिट असेल, त्याबदल्यात त्या किमतीची पुस्तके तुमच्याकडे ठेवली जातील.

३. इतर खर्च ऑफिस सेटपसाठी 

जॉईन कसे व्हाल?

१. जॉईन होण्यासाठी आधी 9119583040 या क्रमांकावर मेसेज करून (WhatsApp किंवा SMS) तुमचे लोकेशन (शहर) शाखा स्थापनेसाठी उपलब्ध आहे का याची माहिती घ्या.
२. तुमच्या लोकेशनला जागा उपलब्ध असेल तर तुमची संपूर्ण माहिती मेसेज करा. उदा. तुमचे पूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, सध्याचा अनुभव, ऑफिससाठी जागा तयार असेल तर त्याचा पत्ता, फोटो इ.
३. माहिती योग्य वाटल्यास तुम्हाला आधी जॉइनिंग शुल्क भरण्यासाठी लिंक दिली जाईल. जॉइनिंग शुल्क रु. १५,०००/- आहे परंतु सर्व टॅक्सेस धरून रु. १५५००/- असेल. 
४. जॉइनिंग शुल्क भरल्यानंतर तुम्हाला उद्योजक मित्र चे संस्थापक श्रीकांत आव्हाड यांच्याशी चर्चा करता येईल. या चर्चेत तुम्हाला काही शंका असल्यास त्यांचे निरसन केले जाईल.
५. जर जार्चेअंती तुम्ही शाखेसाठी इच्छुक नसाल तर तुम्ही भरलेली जॉइनिंग फी प्रोसेसिंग फी वगळून म्हणजे रु. १५,०००/- तुम्हाला परत केले जातील.
६. जर चर्चा योग्य झाली आणि तुम्ही शाखा स्थापन करण्यात उत्सुक असाल तर तुम्हाला करार (Agreement) कॉपी दिली जाईल. व पुस्तकांचे खरेदी व डिपॉजिट भरण्यासाठी लिंक दिली जाईल.
७. हे पेमेंट झाल्यानंतर श्रीकांत सर स्वतः तुमच्या लोकेशनला भेट देऊन तुमच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन तुम्हाला पुढील माहिती देतील. या भेटीतच करार पूर्ण करून घेतला जाईल.
८. तुम्हाला पहिल्या भेटीत प्राथमिक माहिती दिली जाईल, तसेच पुढे कॉल वर टप्प्याटप्प्यने मार्गदर्शन केले जाईल. पुढच्या दोन तीन महिन्यात दोन तीन जिल्हे मिळून (किंवा प्रत्येक जिल्ह्यावार) आपल्या सर्वांना एका ठिकाणी एकत्र करून सर्वांना एक दिवसाचे मार्गदर्शन केले जाईल.
९. तुम्हाला या क्षेत्रात बऱ्यापकी सेट व्हायला एक वर्ष लागू शकते. चांगले उत्पन्न सुरु व्हायला सहा महिने लागू शकतात. तसेच इथे जे काही भविष्यातील प्लॅनिंग सांगितले आहे ते सुरु होण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष लागू शकते. तुमच्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. आणि जास्तीत जास्त व्यवसायिकांना जोडणे हे तुमच्याकडून अपेक्षित असेल.
१०. पुढच्या तीन वर्षांमधे आपल्या शाखा या अशा बिजनेस सेंटर्स असतील जिथे उद्योजकांना सर्व काही मिळू शकेल. व्यवसाय करण्याचा विचार डोक्यात आला कि उद्योजक मित्र च्या शाखेमधे भेट देणे आवश्यक आहे अशाच प्रकारे तुम्हाला डेव्हलप केले जाईल आणि आपले प्रमोशन केले जाईल.
११. तीन वर्षांमधे तुम्ही स्वतः एक चांगले व्यवसाय मार्गदर्शक म्हणून स्थिरावलेले असाल याची आम्ही खात्री देतो.

इच्छुकांनी 9119583040 या क्रमांकावर मेसेज करून (WhatsApp किंवा SMS) तुमचे लोकेशन (शहर) शाखा स्थापनेसाठी उपलब्ध आहे का याची माहिती घेऊन पुढची प्रोसेस करून घ्यावी… या क्रमांकावर कॉल करू नका. हा क्रमांक फक्त मेसेजिंग साठी आहे.

(जॉइनिंग फी भरल्यानंतर तुम्हाला श्रीकांत सरांशी संपर्क करण्यासाठी वेळ दिली जाईल. आणि तुम्ही पुढे प्रोसेस करू इच्छित नसल्यास तुमची जॉइनिंग फी परत केली जाईल. इच्छुक आल्यास पुढची प्रोसेस केली जाईल.)

धन्यवाद
उद्योजक मित्र

  • 126
    Shares
error: Content is protected !!