वॉरेन बफे यांचे अमूल्य विचार


गुंतवणूक सम्राट वॉरेन बफे हे आज जगभरातील उद्योजकांसाठी, गुंतवणूकदारांसाठी आदर्श आहेत. मागील १५ वर्षांपासून ते जगातील पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये आहेत.

३० ऑगस्ट १९३० रोजी ओमाहा ह्या शहरामध्ये जन्मलेल्या बफे ह्यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. दुसऱ्या महायुद्धांनंतर जगभरात महामंदीच्या सावटामध्ये होते. या मंदीमध्येच मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स बफे यांनी अगदी कवडीमोल भावात खरेदी केले होते. यानंतरच इतिहास सर्वांना ज्ञात आहे.

आजही बफे जगातील टॉप ५ श्रीमंतांमधे आहेत. अभ्यासपूर्वक गुंतवणूक, वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेऊन गुंतवणूक करणे हे बफे यांच्या श्रीमंतीचे रहस्य आहे. बफे कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात यावर जगभरातील गुंतवणूकदार लक्ष ठेऊन असतात, कारण त्यांनी निवडलेली कंपनी अपयशी होऊच शकत नाही यावर गुंतवणूकदारांना विश्वास असतो. आज जगभरातील जवळजवळ सर्वच क्षेत्रांमधील कंपन्यांमधे बफे यांची गुंतवणूक आहे.

गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणार्‍या बफे ह्यांनी सामाजिक कार्यातही मोठा सहभाग नोंदवला आहे.

वॉरेन बफे यांचे अमूल्य विचार
१. कधीही एका इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) वर अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
२. किंमत जी तुम्ही देता, मुल्य जे तुम्हाला मिळते.
३. जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
४. खर्च करुण शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
५. आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजु नका.
६. एक टोपल्यात तुमचे सर्व अंडे नका ठेवू.
७. नदी किती खोल आहे हे बघण्या साठी दोनही पायांचा उपयोग नका करू.


८. धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.
९. मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
१०. नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका,नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.
११. स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक
१२. प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
१३. मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.
१४. नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
१५. आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेलं होत.
१६. पैशाची बचत करण्या साठी वयाची गरज नसते.
१७. जितक्या लवकर चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवता येईल तितक्या लवकर पैसा गुंतवा

_

संकलन
उद्योजक मित्र

=================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र


2 thoughts on “वॉरेन बफे यांचे अमूल्य विचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!